Wednesday, April 23, 2025
Homeबातम्यानिगडी : वैद्यकीय क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान

निगडी : वैद्यकीय क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त पुण्याजवळील निगडी-यमुनानगर येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सानिका गवस, प्राजक्ता निफाडकर, सुजाता जोशी भावे, अरूंधती करमाळकर, कुमुदिनी पाठारे, मीना दोशी, अश्विनी तापशाळकर, स्नेहल घोडे, प्रतिभा लबडे, चैत्राली इनामदार, शर्वरी यरगट्टीकर , सेवानिवृत्त परिचारिका सौ.माधुरी डिसोजा कुमठेकर या कर्तबगार महिलांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नानानानी पार्क येथे जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेत्या मा. सुलभा उबाळे होत्या. संघाचे अध्यक्ष श्री. गजानन ढमाले यांनी प्रस्ताविकात संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

सौ. मंगला पाटणकर, सौ. विनीता श्रीखंडे यांनी सत्कारार्थी महिलांचा परिचय करून दिला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..

यावेळी श्रोत्यांमध्ये ज्येष्ठ कवी रमाकांत श्रीखंडे, बाबू डिसोजा यांची उपस्थिती लक्षणीय होती.

सर्वश्री मुजुमदार, गुंजाळ, चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता