१. जवान
तीन दिवसांपूर्वी
हळदीने तो नहाला
सीमेवरची हाक ऐकूनी
तो कर्तव्य दक्ष जाहला
दोन दिवसांपूर्वी
मातेचे झाले गतप्राण
परत फिरला देण्या
भूमातेसाठी प्राण
सहा महिन्याच्या बाळाची
हरवली बापाची छाया
भूमातेला रक्षिण्यात
आटली मुलावरील माया
या वेड्या जवानाला
भारत जीव की प्राण
हाच आहे खरा
मातृदिनाचा अभिमान
२. कारस्थानी वृत्ती
अरे पापींनो,
तुमचे पापी कारस्थान
थांबणार केव्हा
आतंकवादी पोसणे
सोडणार केव्हा
धर्माच्या नावावर
करता भ्याड हल्ले
आणि आम्हाला देता
शांत राहायचे सल्ले
देश विकासा एवजी
केला आतंकवाद्याचा विकास
मग का करायचे आम्ही
तुमच्या संगे मिलाप
२६/११, लोकल स्फोट,
उरी, पुलवामा, पहलगाम
अशी किती उदाहरणे द्यावी
भोळेपणाचा आव आणून
तुम्ही किती माती खावी
जोवर तुमच्या कुरापती
थांबणार नाही
तोवर तुम्हाला धडा
शिकविल्या शिवाय
आमचे जवान थांबणार नाही
— रचना : सौ. शितल अहेर. खोपोली, रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
,🙏🙏🙏
फारच सुरेख
,🙏🙏🙏