अभ्यासपूर्ण “हिंदु” ग्रंथ !
’हिंदू’ या शब्दाबाबत अनेकांनी कळत-नकळत असे गैर समज पसरविले होते नव्हे तर आजही पध्दतशीरपणे ते पसरविण्याचे नतद्रष्ट कार्य, नानाविध अहिंदू धर्म संस्था, संघटना या गोर-गरीब, पददलितांच्या नावाचा कैवार घेत ’एन.जी. ओ’, द्वारा सातत्याने शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार प्रसार करीत आहेत. (विशेषतः दुर्गम अशा दुर्लक्षित पण अशिक्षित आदिवासी जनमानसात) असो..
अशा या परिस्थितीत सनातन भारत वर्षात आज ‘असूनी खास मालक घरचा म्हणतील …..त्याला’ अशी बहुसंख्य हिंदूंची परिस्थिती अन् मन:स्थिती सुध्दा झाली आहे. कारण हे राष्ट्र ‘निधर्मी राष्ट्र’ असं आपल्या भारतीय घटनेतच नमूद केले आहे.
तर अशा या प्रतिकुल परिस्थितीतर सुध्दा हिंदू धर्म, संस्कृती, रुढी परंपरा, त्यांचे वंदनीय धर्म गुरु (आदि शंकराचार्य), स्वामी नारायण मंदिर, हिंदू सेवा संघ, वनवासी कल्याण आश्रम केंद्र, तलासरी, आदिवासी सेवा संघ, विश्व हिंदू परिषद, विवेकानंद केंद्र, मसुराश्रम, गोरेगाव मुंबई, स्मार्टफोन वरील अखंड हिंदू राष्ट्र‘, भारत-वर्ष’, देवधर ब्लॉग, श्रीराम ब्लॉग आदी संस्था वगैरे धर्म, प्रार्थना स्थळे अन् त्यांच्या महतीचे कार्य रामकृष्ण मठ, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई, हिंदू महासभा सारख्या संस्था सातत्याने करीत आहेत.
आज सामान्य हिंदू माणूस ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ असं मोठ्याने म्हणू शकतो का ? ‘विविधतेत एकता’ असणारा एकच धर्म या जगात आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचा समस्त हिंदूंचा ‘हिंदू धर्म’ हाच होय. या धर्माच्या प्रचार प्रसार करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती शिवाय प्रवचनकार, कीर्तनकार यांचा सुध्दा सिंहांचा वाटा आहे.
त्याच प्रमाणे व्याख्याते, साहित्यिक, स्तंभलेखकादी हे सुध्दा अभिमानाने ‘हिंदू’ संबंधित जतन-संवर्धनाचे कार्य सातत्याने करीत आहेत. त्यात प्रामुख्याने प्रख्यात साहित्यिक, स्तंभलेखक श्री.सुनील सोनावणे उपाख्य ‘शिवेंद्र’ लिखित
{ कोण होते ?
हिंदू … ..{ कोण आहेत ?
{ कोण होतील ?
हा कृष्णा प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ नुकताच वाचनात आला.

या ग्रंथात एकूण २२ प्रकरणातून लेखकाने समग्र ‘हिंदू’ धर्म,संस्कृती,रुढी व परंपरादीवर यथोचित असा ऐतिहासिक असा संशोधनात्मक मागोवा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे हे हा ग्रंथ वाचताना सृजन वाचकांना सहज लक्षात येईल.
यात पहिल्या प्रकरणात ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ विदित करून या सनातन धर्माच्या इतिहासाची आवश्यकता नमूद केली आहे.तत्पूर्वी वैज्ञानिक, धार्मिक दृष्टिकोनातून ब्रम्हांड निर्मिती कशी झाली हे सप्रमाण दाखवून दिले आहे. शिवाय “गायत्री मंत्र’’ त्यांचे वैज्ञानिक , अध्यात्मिक महत्त्व सप्रमाण दाखवून दिले आहे.
‘हिंदू’ सह अन्य म्हणजे यहुदी (ज्यू), पारशी (झरथुष्ट्र) धर्म, शिंटो, जैन, बौध्द, कन्फ्यूशियन, ताओ, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बहाई आदी धर्माचा ऐतिहासिक असा संशोधनात्मक मागोवा घेतला आहे.
‘ हिंदू‘ धर्मावर लेखकाने सविस्तरपणे लिहितांना जगातील सर्व भाषेची जननी म्हणून गणल्या गेलेल्या ‘संस्कृत’ भाषेवरील लेख खरोखरच उल्लेखनीय असा आहे. एवढ्यावरच न थांबता लेखक ‘शिवेंद्रू’ यांनी हिंदू देव-देवतादींच्या महती अन् माहिती विस्तृतपणे सप्रमाण सादर केली आहे. एवढ्यावरच लेखकाने पूर्ण विराम न घेता संशोधक ‘शिवेंद्रू’जीनी ‘हिंदूत्वाच्या पुरातन अस्तित्वाचे जगभरातील पुरावे सादर केले आहेत.ते सप्रमाण आहेत हे विशेष होय.
मलपृष्टावरील ‘ब्लर्ब’वरील मजकुरात लेखक लिहितात,
”हिंदू म्हणजे सूर्य,चंद्रच नव्हे तर साक्षात ‘ईश्वरपुत्र !’ कोणे एकेकाळी जगभरात हिंदूंचे वैभवशाली ‘साम्राज्य’ होते… वगैरे वगैरे वगैरे..आज नाममात्र भारत, नेपाळ या देशात हिंदूंचे अस्तित्व आहे.पण तेही धोक्यात आहे.

गत वैभवशाली वैभवाला हिंदूंची सहनशीलता अन् स्वा.वीर सावरकर नेहमीच म्हणायचे, ’मला काय त्याचे..ही कद्रू, आपमतलबी वृत्ती, दूरदृष्टीचा अभाव यामुळे “हिंदू” धोक्यात आहे. हिंदूंनी आपला खरा इतिहास कधी शोधलाच नाही तसेच इतिहासापासून काहीही ‘धडा’ घेतला नाही ही खंत लेखक आपल्या ब्लर्बवर व्यक्त करतात.
या अनमोल ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात नमूद केलेल्या विविध धर्मांची बोध चिन्हे, धर्म निशाणी, त्यांचे ध्वजादीची छायाचित्रे छापली आहेत. फक्त हिंदूंचा इतिहास शिकायचा नसतो तर त्यापासून काही बोध घेऊन भविष्यात या सनातन धर्माचे जतन संवर्धन करणे हे प्रत्येक हिंदूंनी संघटित व्हावे असा मोलाचा सल्ला या ग्रंथात दिला आहे.
सर्व हिंदूंनी हा ग्रंथ अवश्य अभ्यासावा असा आहे. या सनातन धर्माची भव्य, दिव्य पताका पुन्हा एकदा जगभरात उभारावी यासाठीच या ग्रंथाचा प्रचार प्रसार होणे ही काळाची गरज आहे; शिवाय या ग्रंथाचा अनुवाद अन्य भारतीय भाषेत विशेषतः इंग्रजी भाषेत व्हावे ही नम्र विनंती.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विद्यमान कार्याध्यक्ष श्री.रणजित सावरकर यांची मुद्देसूद अशी आशीर्वादात्मक शुभेच्छा खरोखरच वाचनीय अशी आहे.
अर्पण पत्रिका अनोखी अशी लक्षणीय आहे. उत्कृष्ट, आकर्षक मुखपृष्ठिसह सुंदर मांडणी रचनासह हा ग्रंथ लिहून तो प्रकाशित केल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह आपल्या हिंदूत्वाच्या पुढील वाटचालीस “श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीकृष्ण जय हिंदुराष्ट्…

— परीक्षण : नंदकुमार रोपळेकर.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मनापासून धन्यवाद, नंदकुमार जी..!🙏