Sunday, June 22, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“गगन भरारी”

आज मी गगन भरारी या देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या, भरारी प्रकाशन, मुंबई तर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा आस्वाद आपल्या वाचक रसिक सगळ्यांसाठीच घेणार आहे.

गगन भरारी हे पुस्तक हातात पडल्यावर मी अक्षरश: एका बैठकीत २६ महिलांचा पूर्ण सविस्तर, प्रेरणादायी जीवन प्रवास एका झटक्यात वाचून संपवला. या पुस्तकातील मुलाखती या महिलांनी मोकळेपणाने आपलं मन व्यक्त केल्यामुळे प्रकाशित होऊ शकल्या.

या पुस्तकाचे लेखक देवेंद्र भुजबळ हे एक संवेदनशील लेखक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक या ज्येष्ठ पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. संकटावर मात करून आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या महिलांचे परिचय या पुस्तकात आहेत.

आज समाजात खरे आदर्श सापडत नाहीत. महिला हिरो हिरोईनी ते आयडॉल्स काही राजकारणी हे आदर्श असतात पण केवळ तेच आदर्श असतात असं नाही. खरे आदर्श ही सामान्य जनमानसात आढळतात. आदर्श ह्या अतिशय सामान्य परिस्थितीत झगडा करून पुढे आलेल्या या महिला आहेत. त्या प्रत्येकी कडून काही ना काही थोडा अंश तरी आपण घ्यावा. मधमाशी कसा विविध फुलांवर फिरून मन शोषून घेते, तसा या सर्व महिलांच्या प्रेरणादायी प्रवासातून जे श्रेयस आणि प्रेयस आहे ते सगळ्यांनी टिपून निवडून घ्यावं ; अशी माझी सर्व वाचकांना विनंती आहे.

गगनभरारी हे पुस्तक हे यशस्वी महिलांचा जीवन प्रवास कसा प्रेरणादायी ठरू शकतो हे दर्शवतं. प्रतिकूल परिस्थितीशी झगडतच स्त्रियांना आपले अस्तित्व निर्माण करावं लागतं. पुरुषांपेक्षा स्त्रियांचा संघर्ष निश्चितच अधिक असतो.

या पुस्तकाचे प्रकाशन केलेल्या लता गुठे ह्या देखील एक आदर्श महिला आहेत. एकूणच या सर्व महिलांनी जीवनात केलेले कार्य प्रेरणादायी आहे.

मधु मंगेश कर्णिक

ह्या पुस्तकाला मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना लाभली आहे. गगनभरारी म्हणजे यश कथा संग्रह आहे. स्तंभ संग्रह म्हणजे शाळेतल्या निबंधाची वही वाचल्यासारखं वाटतं असे एका प्रकाशकाने मला सांगितलं होतं. आज माझी ४९ पुस्तके प्रकाशित झाल्यावर मला कळतंय की या निबंधातूनच माझा एक यशस्वी आणि रसिक असा वाचक वर्ग निर्माण झाला. तसंच या २६ महिलांचं प्रेरक जीवन वाचून विविध तरुणांना तरुणींना आणि जेष्ठांना सुद्धा प्रेरणा मिळेल. प्राप्त परिस्थिती, वय, संकट, घडणाऱ्या घटना यानुसार गगनभरारी घेण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला करते. प्रत्येक वेळी तो यशस्वी होईलच असं नाही. पण हे पुस्तक वाचून आपण फार मोठी भरारी मारू शकलो तर चांगलंच आहे, पण निदान छोटीशी तरी चांगली भरारी आपण मारावी. तरच या पुस्तकाचं वाचन हे तुम्हाला काहीतरी फलश्रुती देईल असे मी म्हणते.
नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे.

शुभांगी पासेबंध

— परीक्षण : शुभांगी पासेबंद. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. शुभांगी पासेबंद यांनी ‘गगन भरारी’ या पुस्तकाचाअतिशय सुंदर परिचय करून दिला आहे. देवेंद्रजी भुजबळ यांनी 26 कर्तबगार महिलांचा प्रेरणादायी प्रवास शब्दबद्ध केला आहे. या सर्व महिलांच्या गगनभरारीस मनःपूर्वक शुभेच्छा!!
    अभिनंदन!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?