Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्य"प्रतिभेचा झरा : अलका भुजबळ" - छान प्रतिसाद

“प्रतिभेचा झरा : अलका भुजबळ” – छान प्रतिसाद

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांची सौ प्रतिभा पिटके यांनी फारच सुंदर जीवन कथा लिहिली,या बद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन व आभार.

या जीवन कथेला ज्येष्ठ, श्रेष्ठ तसेच शुभ चिंतक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. वाचकांच्या या प्रतिक्रिया पुढे देत आहे.या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपला लोभ असाच कायम असू द्या.
आपली
टीम एन एस टी.


सौ.अलका भुजबळ ,
सप्रेम नमस्कार.
तुमच्या जन्मदिनी प्रतिभा पिटके, अमरावती यांनी खूप सविस्तर आणि तितकेच वस्तूनिष्ठ लिहिलेला लेख वाचला. पूर्व आयुष्यात पत्रकारितेचा अनुभव नसताना देखील तुम्ही किती मेहनतीने आपले न्यूज पोर्टल चालवीत आहात, हे मी अनुभवले आहे. श्री देवेंद्र आणि तुम्ही दोघे “मेड फॉर इच अदर“ असे आहात.

तुम्ही स्वतः कॅन्सरचे पेशंट होता. त्यात तुम्ही खूप त्रास काढला आहे हे आता सांगूनही खरे वाटत नाही. सतत हसरा , प्रसन्न चेहरा यानेच खरी प्रेरणा आम्हाला मिळते .
पोर्टलच्या प्रकाशनाचे काम रोज वेळेच्या वेळी पार पाडण्याची हातोटी याबद्दल मी आणि माझी पत्नी अशा दोघांना कौतुक वाटते.

मी स्वतः आयुष्यभर पत्रकारिता केल्यामुळे हे पोर्टल चे काम नियमित करणे किती कठीण आहे हे मला चांगलेच माहिती आहे. पोर्टलच्या अनुभवातून निर्माण केलेल्या साहित्यातून आठ पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. सेवानिवृत्तीच्या काळात दुखण्या खूपण्याच्या तक्रारीत आयुष्य घालणाऱ्या इतरांच्या तुलनेत तुमचा दिनक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे .

देश विदेशी विखुरलेल्या मराठी बंधू भगिनींना तुम्ही उभयतांनी लिहिते केले आहे. हीच तुमची पुण्याई आहे हे खरेच.
या निमित्ताने तुमचे अभिनंदन.
प्रा डॉ किरण आणि शलाका ठाकूर, पुणे


🕉️🙏अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सौ अलकाताई देवेंद्र भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांच्या प्रेरणादायी स्वरूपाच्या उत्तमपैकी चाललेल्या सर्वांगिण कार्यास मनापासून अभिवादन करण्यास मला मनस्वी आनंद होत आहे.

अनेक संकटावर मात करून कृतार्थ आणि यशस्वीपणे जीवन जगण्याची त्यांची अलौकिक कार्यनिष्ठा प्रशंसापलिकडची आहे.सौ.अलकाताईंना मला तरी ‘किमयागार’ असचं म्हणावसं वाटतं. त्यांच्यापाशी बुध्दी, वेळ, जीवघेणी ओढ, जिद्द लपलेली आहे.तीच त्यांना ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टलच्या सहाय्याने समाज जीवनातील सौंदर्याची मर्मस्थळे शोधण्यास मदत करते, असा माझा अनुभव आणि तेवढाच विश्वास वाटतो.

आपल्या निर्मितीने त्यांनी या जगाकडे, मानवता भावनेने पहाण्याची दृष्टी पालटून टाकली आहे.आचार विचार आणि आकाराची छान पैकी सांगड घातली आहे.त्यांच्यामुळेच आणि पती देवेंद्र समवेत या पोर्टल द्वारे, साहित्य, संगीत, कला, शिल्प, काव्य, पर्यटन, निसर्ग, पर्यावरण आणि पुस्तकं या विविध पैलूंचे दैनंदिन दर्शन देत प्रत्येक माणसाला त्याच्या विचार आचारांना आनंदायी प्रफुल्लित केलं आहे. जीवन जगण्यासाठी हे फार मोठे विधायक मानवतावादी कार्य आहे.आणि त्याच्या पाठीशी सौ. अलकाताईंची प्रेरक शक्ती आहे, हे विसरून चालणार नाही.

माझ्या त्यांच्याबरोबरच देवेंद्रजींच्या अतुलनीय सहभागाबद्दल थोडेसे कां होईना कौतुक केलेच पाहिजे. माझ्या वयानुसार उभयतांना अधिकाधिक आरोग्यदायी, ऐश्वर्यसंपन्न दीर्घआयुष्य लाभो असा शुभाशिर्वाद या वाढदिवसाच्या निमित्ताने देत आहे….
— सुधाकर तोरणे. परीक्षक तथा निवृत्त माहिती संचालक, नाशिक


खूपच ग्रेट आणि सकारात्मक आहे अलकाताई.🙏
देवाचे भरपूर आशीर्वाद आहेत त्यांच्या बरोबर….
खूप खूप अभिनंदन आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अलकाताईंना.🌹🍫

प्रत्येक महिलेने प्रेरणा घ्यावी त्यांच्या कडून असं व्यक्तिमत्व आहे. प्रतिभा पिटके अत्यंत प्रतिभावंत लेखिका आहेत.मला गुरुभगिनी समान आहेत.खूप सुंदर लिहिले आहे 🙏🌹

  • — प्राची गडकरी, संत साहित्य अभ्यासक, मुंबई .


सौ. अलकाताई
यांस सस्नेह नमस्कार.
वयाचे, अनुभवाचे, वरिष्ठतेचे, प्रतिष्ठेचे सारे पारंपारिक अडथळे पार करून आजवर टिकून राहिलेल्या आपल्यामधील स्नेहबंधनाचे स्मरण वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच स्नेहाचे, जगण्याचे, जपण्याचे सारे अर्थ आपण उभयतांनी शिकवलेत मला, म्हणूनच कृतज्ञता आणि शुभेच्छांचा गुलदस्ता अर्पण.🍩
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं !!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा💐
— शुभेच्छूक अर्थातच आपला
सुरेश गोपाळे, मुंबई


आ.अलकाताईंना षष्ठीपूर्तीच्या आभाळभर शुभेच्छा.
आज प्रतिभाताईंचा लेख वाचून त्यांचा संघर्षातून पुढे येऊन यशस्वी जीवनप्रवास कळला. अनेकांना त्यामुळे प्रेरणा मिळते.
सुंदर साध्या, कलागुणांनी युक्त अशा पत्नीला आ.देवेंद्रसरांसारख्या कर्तबगार पतीची साथ लाभली. सामाजिक कार्यात अग्रेसर व माणुसकी जपणारे आपले कुटुंब समाजाला आदर्शवत आहे. अलकाताईंना निरामय आरोग्य लाभो व त्यांच्या हातून सतत नवनवीन कार्य घडो, त्यांच्या आनंदाची बाग सतत बहरत राहो, ही ईशचरणी प्रार्थना.
– अरुणा दुद्दलवार. लेखिका, कवयित्री. दिग्रस, यवतमाळ


अलकाताई
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
HAPPY BIRTHDAY

  • – सुनील चिटणीस, लेखक, पनवेल.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉.

  • बिपिन चौबळ
  • निवृत्त चीफ कॅमेरामन, फिल्म्स डीव्हिजन, मुंबई.


  • Please convey birthday wishes to Mrs Alka tai and wishing her a healthy life ahead. She seems to be a fighter and overcoming hurdles in the life with a fighting spirit. Inspiring. God bless her 😊
    — Supriya Sagare. Mumbai.


नमस्कार भुजबळ सर. सर्वप्रथम सौ. अलका ताईंना ६०व्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार .
अलका ताई, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावे आणि तुमच्या मनातली सर्व स्वप्ने साकार होऊन तुम्ही यशस्वितेचे अनेक नवनवीन उच्चांक गाठावेत, ह्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्!

सौ. अलका भुजबळ हे काय रसायन आहे, ह्याची चुणूक त्यांनी माझ्या बहिणीला, सोनल साटेलकर हिला, प्रत्यक्ष फोन करून जिव्हाळ्याच्या गप्पा मारल्या, तेव्हाच पाहायला मिळाली होती. एका स्वयंपूर्ण पोर्टलच्या “मालकीण” म्हणवता येतील इतक्या महत्त्वपूर्ण स्थानावर विराजमान झालेली महिला सहसा कोणालाच आपणहोऊन फोन करून परिचय करून घेण्याच्या भानगडीत पडत नसेल; पण अलका ताई ह्याला अपवाद निघाल्या, तेव्हाच त्यांचा मोठेपणा तर जाणवलाच, पण एक “निर्माती” म्हणून त्यांची कार्यकुशलता सुद्धा जाणवली. आपल्या संस्थेला मोठे करायचे आहे, तेव्हा आपला व्यक्तिगत मोठेपणा दूर ठेवून संस्थेचे, कार्याचे हितसंबंध जपणे महत्त्वाचे आहे, हे त्या जाणतात आणि तेच तत्व आचरणात आणतात; म्हणूनच आज न्यूजस्टोरी हे पोर्टल इतके यशस्वी आणि लोकप्रिय ठरले आहे.
अर्थात अलका ताईंना ह्यासाठी पतिराज श्री. देवेंद्र भुजबळ सर आणि कन्या सौ. देवश्री ह्यांची सुंदर साथ लाभत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मला वाटतं आहे की सौ. अलका ताईंनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर जी यशस्वी मात केली आणि आपल्या जीवनाला एक नवे वळण दिले, त्यामागे सुद्धा त्यांचे पती आणि कन्या ह्यांची साथ मौलिक ठरली असणार !
तर अशा हरहुन्नरी आणि कलासक्त महिलेच्या जीवनाचा प्रवास समर्पक शब्दांत उलगडून दाखवणारा माननीय लेखिका प्रतिभा पिटके ह्यांचा लेख वाचायला मिळणे, ही आजच्या दिवसाची महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे, असे म्हणायला हरकत नाही. लवकरच त्यांचे “काॅमा” पुस्तक वाचणार आणि इतर अनेकांना त्यांच्या कार्याची माहिती देणार, हे नक्कीच ! हा लेख लिहून पाठवल्याबद्दल प्रतिभाताईंचे आभार मानते आणि सन्माननीय अलका ताईंना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते. 🙏💐

  • — मृदुला राजे, जमशेदपूर.

  • १०
    अलका ताईंना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा .
  • आशा दळवी, कवयित्री, फलटण

  • ११
    सौं.अलका ताईंना वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा.
  • — गणेश जोशी. व्यंगचित्रकार, ठाणे.

१२
Many many returns of the days And We wish you lovely Happy birthday alkatai
— From sukhdeve and family, Nagpur.

१३
अलका भुजबळ मॅडमना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🌈🎂.

  • — अनिरुध्द अष्टपुत्रे
  • मा.मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

१४
मर्मबंधातली ठेव
काही नाती नकळत जुळतात
शब्दांत न मावणारे भाव
नकळत ओठांवर येतात
अस अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या अलका ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • संगीता कुलकर्णी. लेखिका, ठाणे

१५

खरचं अलकाताईंचे खूप कौतुकास्पद कार्य आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच तुकोबा माऊली चरणी प्रार्थना 🍿🍭🍬🍫🎂💐
सौ. मेहमूदा शेख (गुलाबी), श्रीक्षेत्र देहू, पुणे

१६
💐 Happy Birthday Madam

  • — Anil Chalke, Badlapur
    १७
    वहिनीस वाढ दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आरोग्यसंपन्न जीवनास शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
  • — किशोर सोनवणे, नगर.
    १८
    मा. प्रतिभाताई पिटके यांचा ‘प्रेरणेचा झरा’ आत्ताच वाचले.
    खरोखरच इतरांना सुद्धा प्रेरणा मिळावी आणि अभिमान वाटावा असाच सौ. अलकाताईंचा जीवनप्रवास आहे.
    अलकाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य सुखी, आरोग्यसंपन्न, आणि यशदायी होवो ह्याच मनःपूर्वक शुभेच्छा!🙏
  • – अरुणा गर्जे, लेखिका, कवयित्री, नांदेड

१९

अलका ताईना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा..!☺️🍿🍫🌹🌹🌹

  • — कल्पना गवरे. गझलकार, डोंबिवली.

२०
अलकाताईंना जन्मदिवसाच्या शुभेच्छा.

  • — सुधाकर शहाणे. छ. संभाजीनगर

२१

Dear n daredevil Alka vahini who fought dreaded enemy like cancer n has become an inspiration for many,we all wish her very happy n healthy life ahead.on her birthday 🌹💐
— Ranjitsing Chandel, Retd. DIO. Yavatmal

२२
अलकाताईंना साठी पूर्तीच्या उदंड शुभेच्छा !!
लेख खूप छान लिहीलाय…
🌹🎉🍫🎊🍦🙏🏻

  • डॉ मीना बर्दापुरकर, ठाणे.

  • २३
    प्रतिभा पिटके यांचा अलकाताईंवरचा लेख फारच छान आहे.
    खरोखरच एक अष्टपैलु, रसिक, गुणी व्यक्तीमत्त्व, प्रेरणेचा अखंड झरा..
    अलकाताई… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आपणास उदंड निरामय,निरोगी आयुष्य लाभो..🌹🌹
  • राधिका भांडारकर, पुणे.

२४
“प्रेरणेचा झरा: अलका भुजबळ” लेख खूप आवडला. मॅडम ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • – संजय झनके, नवी मुंबई .
  • २५
    वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन 💐🎂 सौ.अलकाताई.
  • – प्रज्ञा कुलकर्णी, लेखिका, वसमत.

  • २६
    ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎁🎉🎊
  • — कवी अनंत धनसरे, मुंबई.

  • २७
    सर मॅडम ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • — मानसी चेऊलकर.
  • कोकणातील पहिली टिव्ही पत्रकार, अलिबाग.

२८
अलकाताई भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

  • प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
  • निवृत्त माहिती संचालक, मुंबई

  • २९
    सौ अलकाताई खरेतर साठी नंतर कपाळावर एकही आठी न ठेवता जगायचे आयुष्य !

  • – प्रकाश पळशीकर
  • ३०
  • अभिनंदन आणि सलाम सौ अलकाजी यांच्या जिद्द व बहुविध कार्याला🙏
  • रवींद्र तोरणे.
  • निवृत्त जनसंपर्क अधिकारी, वीज मंडळ, मुंबई.

३१
“प्रेरणेचा झरा: अलका भुजबळ “
खूप छान, अलका ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👏🏻🌹

  • — संगीता फुके, नाशिक.

३२
अलकाताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अनेक शारिरीक आणि मानसिक अडचणींवर यशस्वी मात करून आपले “जीवन ऐसे नाव ” हे, सिध्दांतासह सिद्ध करणार्‍या तुम्हाला,तुम्ही हाती घेतलेल्या आदर्शवत कामांत सुखनैव यश मिळण्यासाठी तुम्हाला सुखी, आनंदी दीर्घायुरारोग्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा. 💐

  • वीणा गावडे.
  • निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक,
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.

३३
प्रेरणेचा झरा . … कौतुकास्पद व्यक्तिमत्व .
आम्हाला हि लेखामुळे छान माहिती मिळाली.
मॅडमना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . 💐

  • — शलाका कुळकर्णी. नेदरलँड्स

३४
खूप छान, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व..
अलकाताई यांस वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

  • — नूतन बांदेकर, ठाणे.

३५
अलका…
प्रेरणेचा झरा हा तुझ्यावरील लेख वाचला. तसेच महाराष्ट्र टाईम्स मध्ये तुझा फोटोही वाढदिवसानिमित्त प्रकाशित झाला आहे. तुझ्या कर्तुत्वाचा आम्हां सखींना सार्थ अभिमान आहे. उदंड यश संपादन करत तुझी वाटचाल अशीच बहरत राहू दे.
तुला वाढदिवसाबद्दल अलका@only60
खुप खुप शुभेच्छां.

  • –.

३६
न्युज स्टोरी टुडे च्या निर्मात्या मा. अलका भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
राम खाकाळ आणि परिवार.

३७
अभिष्टचिंतन मॅडम आणि भुजबळ साहेब. आपण सुखासाठी जे जे काही म्हणून करत राहाता त्यात आनंद नक्की मिळतोच. आपण विविध क्षेत्रातील योग्य विषय व व्यक्तीची निवड करुन सातत्य टिकवुन आनंदाने जे जे काही करता त्यात आपल्या सह सुख मात्र खात्रीने सर्वांनाच मिळवून देत आहात. जन्म दिवसाच्या शुभेच्छा सह आम्ही आपल्या बरोबर आहोत. आपला
— विजय होकर्णे. छायाचित्रकार, नांदेड

३८
सर, आमच्या मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी गेली दोन वर्षे माझ्या सासऱ्यांच्या आजारात होतो.ते नाहीत.
पण आजार बरा होऊ शकतो हे मॅडम यांनी केले.आपली आणि मॅडम यांची संवेदना मस्तच.
डॉ गणेश मुळे
उप संचालक (माहिती) कोकण विभाग, नवी मुंबई.

३९

अप्रतिम व्यक्तिमत्व असणारे अलकाताई आणि देवेन्द्रजींना प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • विनोद गणात्रा. ज्येष्ठ संकलक, मुंबई.

४०
प्रेमाचा झरा…
मस्त लिहिले आहे…

  • डॉ दक्षा पंडित, मुंबई.

४१
न्यूज स्टोरी टुडे पोर्टलची निर्माती, कॉमा पुस्तकाची लेखिका तर माझ्या जीवन प्रवास पुस्तकाची प्रकाशिका,अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली व सेवाभावी व्यक्ती नि सर्वांमध्ये आनंद फुलवणारी माझी मैत्रिण सौ .अलका देवेंद्र भुजबळ हिच्या प्रकटदिनानिमित्त साठ दिव्यानच्या औक्षणात खूप खूप शुभेच्छा !
– सौ वर्षा महेंद्र भाबळ. नवी मुंबई.

४२
“प्रेरणेचा झरा:अलका भुजबळ”
खूपच प्रेरणादायी, नमन,शतायुषी भव🙏

  • — प्रकाश कथले. ज्येष्ठ पत्रकार, वर्धा.

  • — टीम एनएसटी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सौ.अलकाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या कार्य गौरवा विषयी माहिती मिळाली.

    गोविंद पाटील सर जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments