तू दिल्या शक्तीसवे जे
या जगी अवतार घेती
नखशिखी लावण्य त्याचे
पाहण्या त्यां दृष्टि दे रे
नाचु दे उल्लास – वेडे
खळखळाटी वाहताना
नादवेडा छंद त्यांचा
सागराताहि गर्जु दे रे
पेलुनी पंखांवरी नभ
जे विहंगत तरत जाती
हात काळचा धरूनी धावती
त्यां धावु दे रे
कोंडवाडी अडकलेल्या
कोवळ्या निष्पाप जीवां
मुक्त करण्यासाठि थोडा
जीव गोळा होउ दे रे
भोगु दे दुःखे विखारी
सत्य उमगाया कुळीचे
भाग्यचक्रातून मोती वेचिती
त्यां वेचु दे रे
कृपणतेचा गाळ काढुन
स्वच्छ मनतळ व्हावयाला
हरक्षणी श्वासात त्यांच्या
ध्यास फुलता राहु दे रे
आर्ष मंत्राने तुझ्या गा
रानवनही तरतरू दे
क्षुद्र मातीतील अंशां
रूप अपुले पाहु दे रे
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य, पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800