Homeसाहित्यबाप्पा

बाप्पा

आज अंगारकी संकष्टीदिनी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

गणेश नटला, रुपडे गोजिरे
चमकती हिरे, स्वप्रकाशे…

कटीवरी दिसे, गोल नाग पट्टा
शोभे बाप्पा मोठा, विघ्न हरे.,.

लीलया गळ्यात, कंठी हार झुले
डोले कानी फुले, पाहू चला…

वाजे टाळ झाँज, मृदंग घेऊन
करिती भजन, तया पुढे…

अर्पुनी प्रसाद, सांगता करत
भक्त तृप्त होत, आशिर्वादे..

पाहुणा गणेश, पूजती तयाना
आवडे सर्वांना, भक्ती भावे…

मागणे नसती, आरोग्य सर्वांसी
सुख सकलासी, अन्य काही….

— रचना : सौ. मीना घोडविंदे. ठाणे

२. अंगारकी चतुर्थी आरती

जयदेव जयदेव जय श्रीगणराया
आरती ओवाळिते तुज मोरया !!
जयदेव जयदेव

समर्पित तुला हे व्रत श्रीगणेशा
इच्छापूर्ती करिसी
ही आस गणाध्यक्षा
जयदेव जयदेव

शुचिर्भूत होऊन
पूजन ते करावे
ध्यान धारणा
नामात तल्लीन व्हावे
जयदेव जयदेव

उपासना उपवास
वेदमंत्र जे वदती
शुभेच्छा आशीर्वाद
तयानाच बहु मिळती
जयदेव जयदेव

घोर तपश्र्चर्येने
प्रसन्न होती सुमुख
त्रिलोकात किर्ती
मिळविती पुत्र अंगारक
जयदेव जयदेव

अंगारकी चतुर्थी हिचे
नाम आहे सार्थ
शुभदिन शुभ घडीने
होई कृतार्थ
जयदेव जयदेव

व्रत आचारी जो
भक्तीभाव श्रद्धेने
सुख समृद्धी वृद्धी
होई निश्चितीने
जयदेव जयदेव

गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया. 🙏🙏

— रचना : मीरा जोशी.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६