लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ SVEEP अंतर्गत जळगाव जिल्हा स्तरीय ऑयकान म्हणून जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन चे सहकारी तथा आपल्या न्युज स्टोरी टुडे परिवारातील सदस्य श्री मदन लाठी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे.
श्री मदन लाठी यांचे सामाजिक कार्य विचारात घेऊन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी ही नियुक्ती केली आहे.
यात जळगाव जिल्ह्यातील मतदारांना मतदाना करिता प्रेरित करणेसाठी व नागरिकांमध्ये मतदान या राष्ट्रीय कर्तव्याची भावना वृध्दिंगत करणेसाठी जनजागृती आणि निवडणुक प्रक़ियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने SVEEP अंतर्गत करण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्ष किंवा व्यक्ती यांचेशी राजकीय स्वरूपाचे संबंध ठेवणार नाहीत या अटीवर जिल्हा ऑयकान म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या नियुक्ती बद्दल मदन लाठी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800