Saturday, July 27, 2024
Homeबातम्यामहाबळेश्वर : अभिनव उपक्रम

महाबळेश्वर : अभिनव उपक्रम

जागतिक पर्वत दिवस व हिलदारी अभियानाला देश पातळीवर ५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रसिद्ध आर्थर सीट पॉईंट वर वन विभाग व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

यात पर्यटकाना महाबळेश्वर इको सेन्सेटिव्ह झोन चे महत्व, वन परिसरात प्लास्टिक व इतर कचरा टाकण्याचे दुष्परिणाम तसेच महाराष्ट्रातील या नंदनवनात आलेल्या पर्यटकांनी नुसत पर्यटक न राहता एक जबाबदार पर्यटक म्हणून राहण्यासाठी काय केले पाहिजे याची संक्षिप्तपणे माहिती खेळाच्या माध्यमातून देण्यात आली.

तसेच या ठिकाणी ओला, सुका, घरगुती घातक व घरगुती बायोमेडिकल कचऱ्या संदर्भात माहिती देण्यासाठी निळ्या, हिरव्या, लाल व पिवळ्या रंगाच्या मोठया डस्ट बिन ठेवण्यात आल्या होत्या.

महाबळेश्वर ला येणारे पर्यटक तसेच शैक्षणिक सहलीसाठी येणारे शाळांचें विद्यार्थी यांच्यासाठी सापशिडी, हॉपस्कॉच, स्पिन व्हिल व बिन इट टू विन इट या खेळांच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण, त्याचे फायदे व तोटे, सफाई मित्रांची सुरक्षा व जबाबदार पर्यटक म्हणून पर्यटन करतांना कुठल्या बाबी आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे याबाबत हसत खेळत माहिती हिलदारी टीमने दिली. या खेळांमध्ये जिकणाऱ्यांना हिलदारी तर्फे प्रोत्साहानपर खास बक्षीस देण्यात आली.

सदर उपक्रमादरम्यान ठेवण्यात आलेल्या सेल्फी स्टॅण्ड ला पर्यटकांनी व विद्यार्थ्यांनी खास पसंती दिली. विविध प्रॉप खालून सर्व सहभागी फोटो काढत होते. यात प्लास्टिक च्या बाटल्यांपासून तयार करण्यात आलेला पाच अंक जो की हिलदारी चे पाच वर्ष व पंच तत्व (अग्नी, जल, वायू, भूमी व आकाश) यांचे महत्व दाखवणारा होता.

उपक्रमात सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्व पर्यटन स्थळांवर असे उपक्रम होणे आवश्यक आहे असे नमूद केले.

सदर उपक्रमासाठी महाबळेश्वर चे वन परीक्षेत्र अधिकारी श्री महांगडे साहेब, संयुक्त वन व्यवस्थापन समिती क्षेत्र महाबळेश्वर यांचे सहकार्य लाभले असून हिलदारींचे डॉ मुकेश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निशांत कदम, अनुराग खरे, फैयाज वारुणकर, खाक्सरअली पटेल, गौरी चव्हाण व अमृता जाधव यांनी परिश्रम घेतले.

— टीम एनएसटी ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments