Homeबातम्या'प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन' प्रकाशित

‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ प्रकाशित

लेखक व छायाचित्रकार डॉ. नितीन सोनावणे यांनी लिहिलेल्या व छायाचित्रित केलेल्या,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नुकताच उत्साहात संपन्न झाला.

यावेळी मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले की, नितीन सोनावणे यांनी अत्यंत परिश्रमपुर्वक अशा अस्सल लोकलावंताना शोधून त्यांचे जीवन कॅमेऱ्यात कैद केले आहे. हे काम मोठे आहे त्यामुळेच शासनाने त्यांचे पुस्तक प्रकाशित करुन हा ठेवा जतन करण्याचे काम केले आहे.

या पुस्तकात महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांच्या स्मृतींना प्रकाशचित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासोबतच शेखर निरंजन भाकरे आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

प्रारंभी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत संगीता कैलास खेडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. सुरेखा विवेक जोशी on माझी जीवन नौका : १६
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : १६