विचारांचा ज्वालामुखी
कोंडलाय प्रत्येकाच्या उरात
तुंबळ युद्ध सुरू आहे
प्रत्येकाच्या मनात
हास्याचे मुखवटे घालतात
जीवन रंगमंचावर वावरतात
ह्रदय फुटून जाईल
वाटतंय या व्दंदात
व्यक्त नाही होता येत
विचारांचा कल्लोळ डोक्यात
सारं सांगावं तरी
कुणाच्या कानात ?
लेखणीचा सुरुंग लावून
आम्ही उतरतो कागदावर
पण ज्यांना लेखणीची
साथच नाही, त्यांचे काय?
अंतस्थ ज्वालामुखीच्या उद्रेकाने
उध्वस्त होऊन
अनंत वेडे फिरताहेत
जगाच्या इस्पितळात
चिघळलेल्या जखमा
तशाच घेऊन उरात
तरीही सारे आम्हालाच
काढतात वेड्यात !!!

— रचना : आशा दळवी. दुधेबावी, सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800