नमस्कार मंडळी.
आपण मी आधी फेसबुकवर आणि नंतर आपल्या पोर्टल वर लिहिलेली “मेरा जूता है जपानी” ही जपान पर्यटनावर आधारित लेखमाला वाचली. ती आवडल्याचे अनेकांनी कळविले. त्यातील निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे. विशेष म्हणजे, काही सहप्रवासी यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. त्या ही या प्रतिक्रियांमध्ये
समाविष्ट आहेत. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक. ☎️ 9869484800
www.newsstorytoday.com
१. ज्या गोष्टीची मी वाट बघत होते ती आज मिळाली. पहिला भाग वाचताना डोळ्यासमोर जपानचे चित्र उभे राहिले. शिबुया चौकचा व्हिडियो अप्रतिम.
कुत्र्याचे स्मारक कथा लक्षणीय.
रोज लेखाची व फोटोंची वाट पाहायची. रात्री आल्यानंतर ‘न्यूज स्टोरी टुडे’ लगेच चालू करणे अपेक्षित नव्हते. पण तुमच्या उत्साहाला मानले पाहिजे.
लाकडी कॅसेल स्थापत्य कला अप्रतिम. Photography मनोवेधक.
Tunnel electric bus great Creation. Kurobe dam Amazing.
तंत्रज्ञानाचा विस्मयकारी आविष्कार. येथे बसून जपान सहल होते. आम्ही भाग्यवान.
केनरोकुएन उद्यान खरंच किती सजगतेने उभे केले आहे. मनापासून काम करणे ही जपानी लोकांची खासियत आहे. तिचा योग्य सन्मान फोटो मधून तुम्ही केला. ही खरी माणुसकी.
फांद्यांना टेकू देण्याची कल्पना भारी. निसर्गाला साथ देऊन योग्य न्याय देण्याची कल्पना भारी. वृक्ष संवर्धनाचा संदेश त्यातून निर्माण झाला. जर्मन गाईड ला सलाम 🫡.
लाकडी घरे व शेजारून वाहणारा कालवा अप्रतिम दृश्य.
सामुराई village छान लिहिलं आहे.
शिकारागावा हेरिटेज व्हिलेज मस्त माहिती.
पारंपरिक गाव, पारंपरिक घरे ठेवा जपून ठेवला आहे जॅपनीज लोकांनी. आधुनिक काळात हे कौतुकास्पद.
तुमच्या दोघांचे फोटो मस्त. प्रफुल्लित चेहरे बघून आनंद झाला.
“माणसाळलेली हरणे आणि हरणाळलेली माणसे”!
शीर्षक फार आवडले.
Photography मनोवेधक.
आगळी वेगळी माहिती.
छान लेख.
बुलेट ट्रेन मधील पुस्तक प्रकाशन खरंच अभिनव कल्पना. असा अनुभव स्वतः घेणे आणि इतरांना देणे हे कौतुकास्पद.
सर्व लेखमाला आवडली.
असे आयुष्यातील क्षण आठवणीत साठवावेत व एखाद्या निवांतक्षणी आठवावेत असे असतात.
तुम्ही दोघे भाग्यवान.
हिरोशिमाचे हृदयद्रावक चित्र दादांच्या तगड्या शब्दांनी रेखाटल्याने त्या घटनेची भयानकता अधोरेखित झाली. ती चित्रे पाहून आवंढा गिळायचे विसरायला झालं. या एकाच वाक्यात भीषणता समजली.
हिरोशिमा शहराचे पुनरुज्जीवन झालेले वर्णन वाचून मात्र जपानी लोकांच्या सुदृढ मानसिक जडण घडणीचे प्रत्यंतर आले. त्यांच्या भरारीचे कौतुक करावे तितके थोडेच. शब्द मनाला भिडणारे आहेत म्हणून लेख आवडला.
टोकियो sky tree व्हिडियो भारी काढलाय. शहर दर्शन झालं.
खरंच तेथून छोट्या छोट्या वस्तू आणून घरी जागा अडवण्यापेक्षा जेथे जाईल तेथे नजरेत सामावून घ्यावे व निवांत क्षणी आठवावे हे खरे पर्यटन. हे लेखातून जाणवले. थकल्यानंतर बस पर्यंत चालून जाण्याचा प्रसंग 😞. अतिशय बारीक निरीक्षण करून जपान बघितले आणि आमच्या समोर त्याचा फोटो रूपाने देखावा निर्माण केला, या बद्दल आदरपूर्वक आभार.
— मृदुला चिटणीस. नवी मुंबई
२. मेरा जूता है जापानी.. चांगले कथन .. उत्तम छायाचित्रे. जपान मधील अनोखे पुस्तक प्रकाशन भावले. गुर्बिंदरजी आणि लू विन चे मराठी पुस्तक प्रेम बघून छान वाटले.
— स्वाती वर्तक. मुंबई.
३. मेरा जूता है जपानी…अगदी सुरेख प्रवासवर्णन. टोकियोला फेरफटका मारल्यासारखेच वाटले. जपानची खरेदी फारच मजेदार. खरोखरच भाषेची समस्या भारत सोडला तर सर्वत्र अनुभवायला मिळते.
— राधिका भांडारकर. पुणे
४. मेरा जूता हैं जपानी… सर्व लेख खूप चांगले आहेत. — प्रिया मोडक. ठाणे
५. दोतोंबुरी चे वर्णन खूप छान. परक्या ठिकाणी चुकामूक झाल्यावर काय होते याची कल्पनासुद्धा अंगावर शहारे आणते. त्यात भाषेचा प्रश्न आला तर परिस्थिती आणखी गंभीर बनते.
— उद्धव भयवाळ. ज्येष्ठ साहित्यिक, छ. संभाजीनगर
६. हिरोशिमाहून आपण सगळेच सुन्न होऊन निघालो. पण त्यानंतर बुलेट ट्रेनने ज्या बुलेट स्पीड ने स्पीड पकडली एव्हढ्या स्पीड मध्ये मुंबई ला लोकल ट्रेन पण नाही पकडली आणि सगळ्यात कहर म्हणजे जपान मध्ये आपण बुलेट ट्रेन सगळे आत चढेपर्यंत थांबवली. अर्थात याचे सर्व credit शिवम the great. ही जपान टूर या अशा संमिश्र घटनांनी कायमच आपल्या सर्वांच्या लक्षात राहील हे मात्र नक्की. भुजबळ सर तुमच्या लेखांसोबत हे सर्व प्रसंग आठवतात.
तुमच्या लेखनाद्वारे पुन्हा एकदा जपानचा दौरा घडला. एकदम नाॅस्टॅलजिक झाले. अनेक किस्से आठवले.
“न भूतो न भविष्यति” असा अभूतपूर्व पुस्तक प्रकाशन सोहळा जपान मध्ये आणि तोही बुलेट ट्रेन मध्ये झाला. या प्रकाशन सोहळ्यात मी अशाप्रकारे कधी सहभागी होईन असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. ही जपान टूर कायम लक्षात राहील हे मात्र नक्की.
— सुरेखा सोडये, (सह प्रवासी) बंगलोर
७. देवेंद्रजी आपले जपान दौऱ्याचे सर्व लेख आवडले. आपण प्रत्यक्षात सुरेख छान वर्णन करतात. लाकडी कॅसलबद्दलचं कुशल लेखन आणि वाटेतील फूडमाॅलचं निरिक्षण अफलातून आहे. लेख थोडे अधिक विस्तारपूर्वक तपशीलवार द्यायला हवे होते, एवढीच किरकोळ अपेक्षा !
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
८. मेरा जूता है जपानी… मधून जपानची छान माहिती मिळाली. अगदी तेथे गेल्यासारखे वाटले. सुंदर फोटो आणि योग्य ती आणि तेवढीच माहिती. लवकरच मी जपानला जाऊन येईन.
— मेघना साने. ठाणे
९. मेरा जुता है जपानी ह्या मालिकेतून देवेंद्र भुजबळ सरांच्या नजरेतून जपानचे नैसर्गिक सौंदर्य आणि अभियांत्रिकी विकास ह्यांचे दर्शन घडल्याने मनापासून आनंद झाला. सरांचे हे प्रवासवर्णन भविष्यात एक दर्जेदार पुस्तक म्हणून नक्कीच गाजणार ! त्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
— मृदुला राजे. जमशेदपूर
१०. मस्त मस्तच… जपानी टुरच्या प्रत्येक ठिकाणचे बारकाईने केलेले माहितीपूर्ण निरिक्षण वाचनीय तर आहेच पण संग्रहित ठेवावे असे आहे. भुजबळ सर, तुम्ही लिहिलेले सर्व आम्हांला वाचायला फार आवडले.
— सौ पौर्णिमा शेंडे, (सह प्रवासी) मुंबई.
११. भुजबळ साहेब, तुमचे सर्व लेख वाचताना प्रत्येक वेळेला वाचतांना जपान अनुभवत होतो. खुपच छान.
— सौ शोभा शिरधनकर. (सह प्रवासी) मुंबई.
१२. जपानमधील अनुभव रोचक वाटले. पुढील लेखाची वाट पहात आहे. माझी प्रतिक्रिया पोस्ट केली आहे.
— प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
१३. मेरा जूता है जपानी… खूप छान फोटो नि माहिती सुद्धा सर. मस्त तरूण दिसताय्..
— प्रा सुमती पवार. नाशिक.
१४. देवेंद्रजी मी तुमच्या फेसबुक वर रोज वाचत होते व तुम्हाला प्रतिसाद ही देत होते, प्रवास वर्णन लिहण्याची तुमची शैली मला खूप आवडली. स्थळ, आजूबाजूचा परिसर, माणसं,त्यांची स्वभाव वैशिष्टे, अगदी ग्रुप मधील व्यक्ती चे हरवणे,सापडणे व आनंद साजरा करणे खूप सुंदर शब्दांत उतरले आहे.
अमेरिका व जपान प्रवास वर्णन छान पुस्तक तयार होईल, पु.ल. गाडगीळ, बापट यांच्या नंतर खूप वर्षांनी असं खुशखुशीत, खुमासदार व माहिती पूर्ण प्रवास वर्णन वाचले. लेखनाला खूप शुभेच्छा.
— प्रा वृषाली मगदूम. नवी मुंबई.
१५. माझे गुरुवर्य आदरणीय देवेंद्र भुजबळ सरांनी व अलका मॅडमनी जपानला जातोय म्हणून सांगताच खुप आनंद झाला. कारण गुरु व गुरुपत्नी अलका मॅडम जपान सफर वर्णनाची मेजवानी देणार हे ओघाने आलेच !
आपल्या ‘मेरा जुता है जापानी’ लेखमालेतील ‘शिबुया’ चौकातील श्वान कथा वाचण्यात आली होतीच पण नव्याने वाचून पुतळा पाहून मन गहिवरून आले.
कारण आम्ही नाशिककर कुटुंबिय श्वान प्रेमी आहोत. सरांचे रसाळ लेखनीतून जपान बद्द्ल अधिकाधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. धन्यवाद सर.
— सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
१६. मा. भुजबळ साहेब, नमस्कार. आपण जपानमधील दिनांक ०२ ते १२ जून पर्यंतचा पर्यटन दौरा यशस्वी व सुखकारकपणे करून मुंबईत सुखरूप परत आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !!
आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर “मेरा जुता है जापनी” ही लेखमाला म्हणजे न्यूज स्टोरी टुडेच्या वेबपोर्टलवरील सर्व वाचकांसाठी मेजवानी ठरली यात शंकाच नाही.
जपान देशातील नागरिक अतिशय शांत, शिस्तबद्ध आणि कठोर परिश्रमाने “दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिरोशिमा – नागासाकी व इतर शहरे नेस्तनाबुत झाल्यानंतरही काही वर्षांत प्रगती करत जागतिक स्तरावर यशोशिखर गाठणा-या जपानी लोकांनी सकारात्मक बदल घडवून आणले. ही अतिशय मौलिक कामगिरी करणाऱ्या जपानी नागरिकाचे मनापासून अभिनंदन !! आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपले शुभेच्छूक
— राजाराम जाधव.
(निवृत्त सह सचिव) आणि परिवार, नवी मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800