लता मंगेशकर….सप्तसुरांची राणी असलेल्या लतादीदी यांच्या नावातही सात अक्षरे हा विलक्षण योगायोग. हिंदी चित्रपट संगीत अतिशय समृद्ध आहे. लतादीदींच्या दैवी आवाजातून अमर झालेली हजारो गाणी ऐकताना त्यांना संगीताचा साज चढवणारे संगीतकार यांचे स्मरण होणे स्वाभाविकच आहे.
विविध संगीतकार आणि गायिका लतादीदी यांच्या दैदीप्यमान कामगिरीचा आढावा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे “अभी ना जाओ छोडकर” हा संगीतमय कार्यक्रम. “शुक्रतारा” या मंचाच्या माध्यमातून शुक्रवार 18 एप्रिल 2025 सायंकाळी ठीक 5 वाजता (साडे पाच नव्हे) ही सूरमयी संध्याकाळ सादर करणार आहे.

या कार्यक्रमात केवळ लता दीदी यांची गाणी ऐकायची नसून संबंधित संगीतकाराच्या योगदानाबद्दल थोडक्यात विवेचन केले जाईल. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सादरकर्त्या तृप्ती सरदेसाई यांना साथ लाभली आहे ती सुप्रसिद्ध गायिका आणि त्यांची मैत्रीण दीपा राव यांची. एक विशेष बाब म्हणून हा कार्यक्रम ठीक पाच वाजता सुरू होईल आणि सात वाजता संपेल.

“पाहुणे कलाकार” म्हणून चंद्रशेखर ठाकूर, मुकुंद वैद्य आणि प्रभाकर रावराणे सहभागी होणार आहेत.
नेहमीप्रमाणेच शुक्रताराचा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. आपण अवश्य यावे आणि या मैफीलीचा आनंद घ्यावा.

हा कार्यक्रम ज्येष्ठालय, वामनराव पै उद्यानाशेजारी, जानुस अपार्टमेंट समोर, टी पी एस रोड, बोरिवली (पश्चिम.)
मुंबई येथे होईल.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800