Homeबातम्या"संगीताच्या माध्यमातून अंधशाळेला मदत"

“संगीताच्या माध्यमातून अंधशाळेला मदत”

कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर नुकत्याच झालेल्या शरद कराओके ॲण्ड लाईव्ह म्युझिक’ यांच्या ‘मेरी आवाजही पहचान है’ या गीत-संगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जमा झालेल्या पैशातून ५१ हजार रुपये अंधशाळेसाठी प्रदान करत असल्याची घोषणा आयोजक श्री शरद ननावरे यांनी केली.

यावेळी श्री शरद ननावरे यानी नेत्रदान, देहदानाबद्दलचे आवाहन उपस्थित गानरसिकांच्या संवेदनशीलेतेला स्पर्शून गेल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या मुलाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेबाबतची गुंतागुंतीची माहिती देताना सर्वांना नेत्रदान, अवयवदानाचे महत्व विषद करुन सुंदर शरीराची राख करण्यापेक्षा कुणाच्या तरी आपले अवयव उपयोगी पडतील याकडे डोळसपणे पाहण्याची विनंती केली.

प्रमुख गायक गायिका निलेश निरगुडकर, मोना कामत प्रभुगावकर यांच्यासह स्वतः आयोजक शरद ननावरे तसेच आशालता, डॉली, शैलजा, चेतना, मिहीर, नरेंद्र, अमर यांनीही चांगली गाणी गात रसिकांची वाहव्वा मिळवली.

पत्रकार आणि ब्रेल लिपीतील ३२ पुस्तकांचे लेखक श्री राजेंद्र घरत यांनी आपल्या मनोगतातून या कार्यक्रमास गानरसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल व चांगल्या हेतूने प्रेेरीत अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रचंड संख्येने उपस्थित असलेले प्रेेक्षक व आयोजक शरद ननावरे यांची प्रशंसा करुन त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी गायकांनी सत्यम शिवम सुंदरम, शोखियोंमे घोला जाए, अजहु ना आये बालमा, ए भाय जरा देखके चलो, दिल चीज वया है आप मेरी जान लिजिए, परदा है परदा, आजा शाम होने आयी, आके तरी बाहोमे हर शाम लगे सिंदूरी, राफ्ता राफ्ता देखो, होठोपे ऐेसी बात अशी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील गाणी सादर करुन प्रेक्षकांना खुश केले.

सचिन पाठक यांच्या सुरेल वाद्यमेळाची साथ गायकांना लाभली.

— टीम एन एस टी. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments