कवयित्री, समाज कार्यकर्त्या सौ. अश्विनी सचिन बोलके यांच्या “शब्द माझे तुझ्याचसाठी” या काव्यसंग्रहाचे आणि निवेदक, गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या “मयूरस्पर्श” चारोळी संग्रहाचे प्रकाशन अभियंता भवन नवीन पनवेल येथे नुकतेच प्रसिद्ध गझलकार ए.के. शेख यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष – ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री, शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आदींच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
दुर्गेश सोनार यांनी, कवयित्री अश्विनी बोलके यांच्या, ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ या पुस्तकाबद्दल, “या काव्यसंग्रहातील कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत तसेच हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात, इतक्या त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत.” असे मनोगत व्यक्त केले.
“मनास होणारा भावनांचा तरल स्पर्श म्हणजे मयूरस्पर्श”, अशा शब्दांत कवयित्री मानसी नेवगी यांनी चारोळीकार मयूर पालकर यांच्या ‘मयूरस्पर्श’ विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
जेष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध गझलकार सन्माननीय ए. के . शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवयित्री अश्विनी बोलके आणि कवी मयूर पालकर यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ आणि ‘मयूरस्पर्श’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले असे जाहीर केले. उत्तोमत्तम कथा कवितासंग्रह निर्माण करणाऱ्या साहित्यसंपदा प्रकाशनची ही दोन्ही पुस्तके आहेत. शब्दशिल्प कलाविष्कार संघ सर्वेसर्वा हिरकणी गीतांजली वाणी यांनी, “दोन्ही पुस्तकांच्या शेकडो आवृत्त्या प्रकाशित होवोत अशा शुभेच्छा दिल्या व मयूर पालकर हे आधुनिक युगातील परिपक्व कवी आहेत, भविष्यात त्यांच्या साहित्यिक संपदेची खास आवड असणारे वाचक असतील” असे त्या म्हणाल्या.
शुभंकरोती साहित्यिक संस्था संस्थापक कवयित्री सोनाली जगताप यांनी दोन्ही पुस्तके आवर्जून वाचण्यासारखी आहेत असे सांगितले. तर कवयित्री प्रियांका कोठावदे, रजनी येवले यांनी मयूरस्पर्श मधील काही चारोळ्यांचे वाचन केले. साहित्य संपदा संस्थेतर्फे निरनिराळ्या क्षेत्रातील भरीव योगदान देणाऱ्या दिग्गज्जाचे सन्मान – पुरस्कार वितरण देखील या सोहळ्यात करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हर्डीकर ह्यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सचिन बोलके ह्यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800