प्रथितयश लेखिका शुभांगी पासेबंद यांच्या “झपूर्झा” या ४९ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते ठाणे येथे झाले.
यावेळी बोलताना श्री भुजबळ यांनी शुभांगी पासेबंद यांनी बँकेतील अधिकारी पदाची जबाबदारीची नोकरी सांभाळत आणि आता निवृत्तीनंतरही त्या जी साहित्य सेवा करीत आहेत त्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी न थांबता पुस्तकाचे अर्धी शतक आणि पुढे शतक पूर्ण करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना लेखिका शुभांगी पासेबंद यांनी बँकेतील नोकरी सांभाळत लेखन करणे म्हणजे तारेवरची कसरत होती, असे सांगून त्यांच्या साहित्य निर्मितीतील विविध टप्पे विषद केले.
यावेळी लेखिका तथा कवयित्री सौ मीनाताई घोडविंदे, आरोग्य संवादक तथा न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या, प्रकाशिका सौ अलका भुजबळ याही उपस्थित होत्या. त्यांनीही शुभांगी पासेबंद यांना
शुभेच्छा दिल्या.
पुणे येथील पार्थ प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या “झपूर्झा” या पुस्तकात १८ लघु कथा आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
धन्यवाद