Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यसार्थक करू या जन्माचे

सार्थक करू या जन्माचे

हे वर्ष नवे, सुख घेऊनि यावे,
वर्ष नवे, हे वर्ष नवे –// धृपद

बरसू देत अमृतधारा
स्वच्छंद वाहू दे वारा
ते बीज धरित्रीपोटी
येऊं दे तरारून आतां
आळसा न द्यावा थारा
ये समृध्दी बहारा
हातांस मिळू द्या कामे,
चैतन्य नवे खेळावे //1//

नवविज्ञानाच्या योगे
क्रान्तीस मिळावी साथ
आसेतू-हिमाचल प्रान्ती
गंगौघ वाहू दे नित्य
गंगा, यमुना,सिंधू
कावेरी जला जोडावे
हे प्रांतभेद नि वैर
जलधारांतूनी संपावे //2//

जन्मा येता प्राणी
जगण्याचा हो अधिकारी
तुम्ही जगा, जगूं द्या त्याला
माणुसकी जागवा खरी
द्या अस्त्रशस्त्र टाकून
जोडू या बंध नात्याचे
संदेश शांतीदूताचा,
माणसापरी वागावे //3//

वाढू द्या प्रेम सर्वांचे
या भारतदेशावरचे
उसळोत भारतीहृदयी
राष्ट्रप्रेम लहरी लहरी
या विविधरंगी देशाचा
आनंद लुटावा खासा
मुक्तांगणी विहरत राहो,
हा पक्षी मम राष्ट्राचा //4//

स्वाती दामले

— रचना : स्वाती दामले.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी