Thursday, March 12, 2026
Homeकलास्नेहांची रेसिपी : ४६

स्नेहांची रेसिपी : ४६

“यम्मी आईसक्रीम केक”

डिझार्ट ही गोष्टच इतकी गोड आहे ना,की सर्वांनांच ती अगदी मनापासुन आवडते. अगदी लहान मुलांपासून आजोबा, आज्जी सुद्धा हे तितक्याच मजेने आस्वाद घेत असतात. अगदी बाराही महिने वेगवेगळी नवनवीन डिझार्ट्स आपण बनवत असतो,हॉटेल्स मध्येही खात असतोच. आज आपण एक असेच मस्त डिझार्ट बनवून सगळ्यांना थंडगार करूया. चला तर मग !

साहित्य :
4 साध्या ब्रेडचे स्लाईस, दीड वाटी फुलक्रीम दूध,जवळपास अर्धीवाटी पिठी साखर साखर, 8..10 थेंब व्हॅनिला इसेन्स, दोन चमचे मिल्क पावडर किंवा फेटलेली मलाई, पाव वाटी फ्रेश क्रीम, दिड वाटी थंड व्हिपींग क्रीम, काजू, बदाम, पिस्ते यांचे पातळ काप, केशर काड्या.

कृती :
प्रथम ब्रेडच्या कडा काढून स्लाईस मिक्सर मधून फिरवून एकदम बारीक करावा. एकदम ताजा ब्रेड असेल तर स्लाईस आधी डिश मध्ये पसरून ठेवले आणि मग मिक्सरमधून काढले तर छान बारीक पावडर बनते आणि ती मिक्स करायला जास्त सोपी होते. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दूध घालून त्यात पिठीसाखर घालावी. आता त्यात ब्रेडची पावडर, व्हॅनिला इसेन्स, मिल्क पावडर, आणि फ्रेश क्रीम घालून मस्त फिरवून एकजीव करून घ्यावे. आता हे मिश्रण एका लांबट आकाराच्या, केक मोल्ड मध्ये किंवा काचेच्या ओव्हनच्या भांडयात काढावे. आता व्हिपींग क्रीम घालून वरून ड्राय फ्रुट्सचे काप, केशर काड्या घालव्यात. शेवटी ॲल्युमिनियम फॉईलने किंवा बटर पेपर ने घट्ट तोंड बंद करावे. ते सेट होण्यासाठी 3/4 तास फ्रीझ मध्ये ठेवावे.
नंतर बाहेर काढून सेट झाल्याची खात्री झाली की सुरीने त्याचे काप करावेत व सर्व्हिंग डिश मध्ये काढून थंडगार सर्व्ह करावे.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments