डॉ बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : ४ दिवसात अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाइन परीक्षा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने गेल्या आठवडयात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी तर चालु आठवडयात १ लाख ६८ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. तर आज, गुरूवारी (दि.१३ मे ) सकाळच्या सत्रात ७७ हजार ५५ तर दुपारच्या सत्रात ९ हजार ९५ अशी एकुण ८६ हजार १०० जणांनी परीक्षा दिली. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्वच परीक्षा सध्या ऑनलाईन सुरु आहेत. या ऑनलाईन परिक्षांमध्ये कसलीही अडचण आली नाही, अशी माहिती विद्यापिठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.
विविध निकाल जाहीर
विद्यापीठाच्यावतीने ‘मार्च-एप्रिल‘ मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या चार दिवसात चार अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
विद्यापीठाच्या बी.ए. , बी.एस्सी. व बी.कॉम. द्वितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्या आहेत. तर या तीनही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या परीक्षा सध्या सुरु आहेत.
तसेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्यूत्तर महाविद्यालयाच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पध्दतीने या परीक्षा होत आहेत. सोमवारपासून विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बी.ए. (इंटरनॅशनल जर्नालिझम), बी.एस्सी. (नेट वर्किंग अॅण्ड हार्डवेअर), बी.एस्सी. (ऍनिमेशन) तसेच बी.कॉम. (ई-कॉमर्स) या चार अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झाले आहेत. बी.ए. व बी.कॉम. अभ्यासक्रमाचे निकाल मे अखेपर्यंत घोषित होतील. तर बी.एस्सी. अभ्यासक्रमाचे निकाल जून महिन्यात घोषित होणार आहेत.
पदवीच्या परीक्षा २५ मे राजी तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा २ जून रोजी संपणार आहे, अशी माहितीही डॉ.योगेश पाटील यांनी दिली.
– देवेंद्र भुजबळ : 9869484800.