सूर्याच्या राशी परिभ्रमणाशी
तज्ञानी ताळमेळ बसवण्यास
हिंदूपंचांगात दरतीन वर्षानी
येतोवाढीव, तोअधिकमास..1
सूर्याचा प्रवेश होत नसल्याने
मलूल वायुविजन आसमंती
टाळती मंगल सकल कटाक्षाने
मलमास त्यासनामे वदंती..2
मराठमोळी हिंदू संस्कृतीत
मानती बराच गे पवित्रकाळ
स्वतःमध्ये बदल गे ज्यास्तीत
घडवती ते आदर्श सर्वकाळ..3
पुरुषोत्तम स्वतः श्रीकृष्णाने
दिधले आपलेच नांव त्यास
मंगल आशीर्वाद दिला देवाने
म्हणती सर्व पुरुषोत्तममास..4
पूजाअर्चा अन दानधर्मास
मानतात सकल महत्वाचे
स्नानजपतप तीर्थाटनास
गरजूना अन्नवस्त्र वाटण्याचे..5
“अधिकस्य अधिकम फलम”
शास्त्र संमत याच न्यायाने
जे अनुसरतात धर्माचरण
लाभे कृपा त्यांना नियमाने..6

— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
