प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि त्यांच्या कुटुंबियांनी, स्थापन केलेल्या सूर्योदय फौन्डेशन आणि लॉयन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते जे.जे. हाँस्पिटलला नुकतीच 36 लाख रु. किंमतीची, कार्डियक केअर युनिट अँम्बुलन्स भेट देण्यात आली. लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या चॅरिटी शो साठीही त्या आपले योगदान देणार आहेत.
यापूर्वी या फौंडेशनतर्फे कोरोना रुग्णांकडून काहीच पैसे न घेता मोफत ऑक्सिजन उपचार करणाऱ्या उत्तर प्रदेशातील भदैनी येथील माता आनंदमयी हॉस्पिटलला १ लाख रुपयांची मदत करण्यात आली होती.
“बच्चे कंपनीचा संदेश”
याशिवाय पौडवाल कुटुंबातील बच्चे कंपनीने स्वतःचा पॉकेटमनी कोरोना कार्यासाठी देऊन एक आदर्श निर्माण केला. या पैश्यातून मुंबईतील जेजे हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. आम्ही मदत करू शकतो तर तुम्ही का नाही ? असा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतुन दिला.
पौडवाल कुटुंबिय त्यांच्या सूर्योदय फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते, हे विशेष.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अनुराधा पोडवाल चे कायॅ खरंच खुप छान
त्या च्या आवजा प्रमाणेच लोकांनचे जीवन सुरेल सुमधूर कराणारे कायॅ 👍प्रणाम व धन्यवाद 🙏