अमेरिकास्थित श्री. रमेश लोकरे तसेच सौ.सीमाताई रमेश लोकरे यांनी त्यांच्या शौनक या मुलाच्या २०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोड जेवण,१ महिन्याचा किराणा,आवश्यक औषधे यासाठी शरणपूर वृद्धाश्रमास ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. लोकरे कुटुंबीय मूळ महाराष्ट्रातील असून व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आहे. तिथे त्यांची साईकॉन आयटी कम्पनी आहे. सध्या संचारबंदीमुळे शरणपूर वृद्धाश्रम मोठया अडचणीत सापडला असताना, ही मदत खूपच मोलाची ठरली. या देणगीबद्दल आश्रमाने लोकरे कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ठाणे येथील श्री राजन खांडेपारकर हे ही या आश्रमास नियमित मदत करीत असतात. त्यांनीही आश्रमास नुकतीच ५ हजार रुपयांची मदत केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे शरणपूर वृद्धाश्रम असून येथे गरीब वृद्धांसाठी राहण्याची मोफत व्यवस्था आहे.
– देवेंद्र भुजबळ :9869484800.
मा.श्री रमेश लोहकरे अमेरिका ,
सस्नेह नमस्कार.
आपले व आपल्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन !
💐💐💐💐💐
आपण नेवासे येथील शरणपूर वध्दाश्रमास ५००००/-रु.अन्नदानासाठी,औषधोपचारासाठी आणि तेही आपल्या
शौनक मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आनंद व्दीगुणित करुन दिलेत,खूप खूप अभिनंदन !
अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते ,मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आपण आपल्या कृतीतून दाखवून दिलेत !
कोरोना काळात दिलेली देणगी ही लाख मोलाची आहे.
आपणास पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुकः-
श्री कृष्णकांत सासवडे
पिंपरी चिंचवड