अलकाताईंनी (सौ अलका भुजबळ) त्यांच्या नव्याने सुरू केलेल्या “न्यूज स्टोरी टुडे” या यू ट्यूब चॅनल वर, आतापर्यंत प्रसारित झालेल्या तिन्ही मुलाखती पाहून मी खूपच भारावून गेले.
आपण पालक म्हणून सामान्य मुलांना वाढविताना आपली इतकी दमछाक होते, तर दोन दोन विशेष मुलांना वाढविताना सौ अर्चनाताई पाटील यांनी काय काय प्रसंगांना तोंड दिले, हे पाहून आपले कष्ट काहीच नाहीत, याची जाणीव झाली. दुसऱ्या मुलाखतीत मी, माझे कुटुंब इतकाच संकुचित विचार न करता, समाजातील उपेक्षित अशा कचरावेचक महिलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रा वृषाली मगदूम मॅडम यांची मुलाखत नवी दृष्टी देणारी ठरली. तर तिसरी, कांक्षा ची मुलाखत ही आपल्या भावनिक, मानसिक समस्या, आधुनिक पद्धतीने कशा सोडविता येतात, याची चांगली माहिती देणारी आहे.
तिन्ही मुलाखती पाहून मला अलकाताईंचा खूप अभिमान वाटला. अलकाताई म्हणजे एक अतिशय प्रसन्न, उत्साही व बहुआयामी व्यक्तिमत्व होय. प्रत्यक्ष रंगमंचावर आणि दूरदर्शनच्या अनेक मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. तसेच त्या व्हॉलीबॉल देखील खेळत असत. एमटीएनल च्या अनेक राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. त्यामुळे स्पोर्टमनशीप ही त्यांची रक्तातच आहे.
अतिशय प्रेरणादायी, निर्भीड, कॉन्फिडेंट, शिस्तप्रिय व तितक्याच मनमिळावू, प्रेमळ व मायाळू असे दोन्ही पैलू जपणाऱ्या अलकाताईना आपण कधीही विचारले कशा आहात ? तर… समोरून त्यांचे “एकदम टकाटक” हे उत्तर हमखास येणार ! हे ऐकताच आपल्याला देखील दहा हत्तीचे बळ मिळते.
अतिशय सकारात्मक वृत्ती असणाऱ्या, सतत काही तरी नवीन शिकण्यात व करण्यात मग्न असणाऱ्या, जीवनात आदर्श ठेवावा अशा सर्वांच्या परिचयाची एक लाडकी मैत्रीण, सोबती म्हणजे अलकाताई आहे. त्यांनी ३८ वर्षे नोकरी केली. पुढे कॅन्सर वर धैर्याने व धीराने मात करून तिथेच न थांबता,”कॉमा” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकावर आधारित “कॉमा” हा माहितीपट प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांनी तयार केला. माहितीपटाचे प्रकाशन केल्यानंतर तो पाहून राज्यपाल उस्फूर्तपणे म्हणाले की, हा माहितीपट हिंदी भाषेत असणे गरजेचे आहे. कॅन्सर वर मार्गदर्शन करण्यासाठी अलकाताई “कॉमा संवाद उपक्रम” राबवतात. तसेच कॅन्सर चे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय यांना वैयक्तिक धीर देण्यासाठी सदैव तत्पर असतात.
पाच वर्षांपूर्वी, त्यांची मुलगी देवश्रीने न्युज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे बी रुजवले होते. पती देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलच्या संपादनाचे काम पाहतात तर अलकाताईनी पोर्टलच्या निर्मितीचे धनुष्य पेलले आहे. याच्याच जोडीला त्यांनी प्रकाशन विश्वातही पाऊल टाकले आहे. अनेक पुस्तकांचे प्रकाशन त्यांनी केले आहे. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यात मी लिहिलेल्या “समाजभूषण २” या पुस्तकाचाही समावेश आहे.

अलकाताई अनेक कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन देखील उत्तम करतात. मनमोकळ्या गप्पा, दंगा मस्ती करून आयुष्याचा आनंद देखील घेतात. देशविदेशात भ्रमंती करीत असतात. सतत काही तरी नवीन देण्याचा व करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता त्यांनी पॉडकास्ट चालू केले आहे. अतिशय उत्तम पध्दतीने मुलाखत घेत नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचे मोलाचे काम त्या करत आहेत. ही अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद कामगिरी करत एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. त्यासाठी मनापासून सलाम.
खरे तर मनुष्य जन्म ही परमेश्वराकडून लाभलेली एक अनमोल देणगी, एक संधी आहे. या संधीचे सोन केलं अलका ताईंनी. अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून सर्व महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला त्यामुळे नक्कीच अनेकींनी एक उभारी मिळेल. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.
बरे, हे झाले त्यांचे सामाजिक क्षेत्र पण घरी देखील एक आदर्श गृहिणीची भूमिका पार पाडतात. घर देखील अतिशय स्वच्छ, टापटीप… आहार देखील अतिशय सकस, पौष्टिक व चवदार. सण, वार, पाहुणचार आग्रह देखील तितकेच आपुलकीने याचा मी स्वानुभव घेतला आहे.
स्वतःकडे देखील लक्ष देणाऱ्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या असे हे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व. एक मोठी बहीण एक मैत्रीण म्हणून कायम माझ्या सोबत राहणाऱ्या अलका ताई. आपुलकीने विचारपूस व काळजी घेणाऱ्या, प्रचंड आत्मविश्वास व धाडसी वृत्ती लाभलेली अशा त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू मी जवळून पाहिले व अनुभवले हे माझे भाग्य.
कोणत्याली नवीन गोष्टीची सुरवात करण्यासाठी केवळ जिद्द असावी लागले हे अलकाताईंनी वेळोवेळी सिद्ध केले आहे.
Hats off to you Alka tai for your positive attitude,hard work n innovative ideas.
अलकाताई तुमच्या या नवीन वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.💐

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869404800.
रश्मी हेडे मॅडमचा लेख सर्वार्थाने उचित आहे.पोर्टलची देदीप्यमान वाटचाल अभिमानास्पद आहे.
आज रश्मी हेडे ताई यांचा यांचा एका नवीन क्षेत्रात एक पाऊल पुढे हा लेख वाचनात आला आणि सौ अलकाताई
यांचा संघर्षमय जीवनपट डोळ्यासमोर तरळला
अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व
स्वतःबद्दल आणि दुसऱ्याबद्दल अत्यंत सकारात्मक असलेली ही व्यक्ती पाहून मन सुखावतं
अत्यंत खडतर परिस्थितीत कुठलीही हार न मानता जीवन कसं जगावं आणि त्याही परिस्थितीत इतरांना आनंद कसा द्यावा हे फक्त अलकाताई कडूनच शिकावं अशा या व्यक्तिमत्वाला माझा त्रिवार सलाम
पुढील कार्यास माझ्या कडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा
रश्मी हेडे यांनी आपल्या लेखात, अलका भुजबळ यांचा एका नवीन क्षेत्रात एक पाऊल पुढे, असा परिचय करून दिला आहे. अलका म्हणजे वाहता अखंड झरा आहे. कधीही न थांबणारा !
शुभेच्छा !
वर्षा तुमच्या सहकार्या मुळे आणि तुमच्या प्रेरणेमुळे मी हे काम करू शकते. रश्मी आणि तुझे आभार
अलकाताईंचा जीवनपट सर्वसामान्यांना नक्कीच प्रेरणादायीआहे. कॅन्सर पासून मुक्ती मिळवून पुन्हा त्याच विषयावर कॅन्सरग्रस्त पेशंटना मार्गदर्शन करताना सर्व क्षेत्रात कार्यरत राहून पुन्हा संसारात देखील तेवढीच कार्यतत्परता दाखवायची हे काही खायचं काम नाही. अलकाताई, तुमच्या अतुलनीय धैर्याला मनापासून सलाम.
आसावरी ताईंचा प्रवास छान प्रेरणादायी आहे. डॉ. गौरी माहुलीकरांचे मार्गदर्शन लाभले, भाग्यवती आहात.