नाक चाफेकळी
खळी गालावरी
स्वर्गाची अप्सरा
आली या भुवरी //१//
सजली सुंदरा
रंग सारे ल्याले
पाहुनी तिजला
अंग मोहरले //२//
करी रुणझुण
पैंजणे पायात
सुंदर डोलती
कुंडले कानात //३//
कोवळ्या ऋतूची
किरणे कोवळी
हसताना तिच्या
येई गाली खळी //४//
कमनीय बांधा
खाण सौंदर्याची
जणुकाही कोर
नभाच्या चंद्राची //५//
नाजूक सुंदर
अशी ही ललना
चोरुन पहाण्या
करतो बहाणा //६//
हळूच पहावे
मनात हसावे
फक्त आणि फक्त
तिचाच बनावे //७//

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
