ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे, समाजातील प्रत्येकाला शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेणे हे नवी मुंबईतील श्री गजानन लीला ट्रस्टचे ध्येय आहे. वायूदलातून आणि त्यानंतर पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी श्री जगदीश जाधव हे या ट्रस्टचे प्रमुख आहेत.
रायगड जिल्ह्यातील केवाळे येथील जिल्हा परिषद शाळेला या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी १६ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक अशा स्कुल बॅगस्, वह्या, लेखन साहित्य, प्रीमियम ड्रॉईंग संच अशा साहित्याचे वाटप केले. तर ६० विद्यार्थ्यांना चित्रकला संच देण्यात आले. या मुलांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद, त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि उत्साह हेच या कार्याचे यश आहे.
हा कार्यक्रम आपण पुढील लिंक वर क्लिक करून अवश्य पहा.
शिक्षण हीच खरी संपत्ती असून ती प्रत्येक मुलाला मिळावी यासाठी हा ट्रस्ट सातत्याने प्रयत्नशील आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
