Tuesday, September 16, 2025
Homeबातम्याआता जहाजांवर दिसणार महिला कर्मचारी !

आता जहाजांवर दिसणार महिला कर्मचारी !

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल नुकतेच उचलण्यात आले आहे. ते म्हणजे ॲंग्लो-ईस्टर्न शिप – मॅनेजमेंट (इंडिया) प्रा. लि. आणि नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने, सागरी उद्योगात महिलांच्या रोजगारास प्रोत्साहन देणारा समझोता करार संपन्न झाला आहे.

महिला खलाशांना सक्षम करणे, हा या कराराचा महत्त्वपूर्ण उद्देश असून यासाठी महिलांना नुसी मेरिटाईम अकादमीमध्ये सहा महिन्यांचे जनरल पर्पज रेटिंग कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर नुसी आणि ॲंग्लो-ईस्टर्नद्वारे संयुक्त निवड प्रक्रिया होईल, ज्यामुळे निपक्ष:पाती आणि गुणवत्तेवर आधारित महिलांना रोजगाराची संधी निश्चित मिळेल.

ॲंग्लो-ईस्टर्न कंपनीचे नोकरीचे निकष व पूर्तता झाल्यानंतर जहाजावर महिलांना रोजगाराची संधी निश्चित मिळेल. या सामंजस्य करारामुळे नौकानयन क्षेत्रात विविधता आणि सर्व समावेशाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलत आहोत, अधिकाधिक महिलांचे स्वागत करण्यासाठी शिपिंग उद्योग प्रयत्नशील होत आहे. ॲंग्लो-ईस्टर्न कंपनीने घेतलेल्या या प्रगतीशील दृष्टिकोनाबद्दल आणि जहाज उद्योगात महिलांचे अधिक भविष्य घडवण्याच्या वचनबद्धतेबद्दल आम्ही कंपनीचे आभार मानतो. आम्ही एकत्र येऊन भारतातील महिला खलाशांची पुढील पिढी घडवत आहोत, असे नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी यावेळी सांगितले.

मारुती विश्वासराव

— लेखन : मारुती विश्वासराव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments