Wednesday, September 17, 2025
Homeबातम्याआदर्श आईबाबा, आदर्श मुलगी !

आदर्श आईबाबा, आदर्श मुलगी !

आजकाल आपल्याला बऱ्याच घरात असे बघायला मिळते की, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून आईवडील लहान मुलांच्या हातात खेळणे म्हणून खुशाल मोबाईल देतात आणि आपापल्या कामात गर्क राहतात. पुढे हेच आईवडील मुलं अजिबात मोबाईल सोडत नाहीत, म्हणून तक्रार करत असतात.

काही आईवडील मात्र अत्यंत सजग राहून आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार होतील, त्यांचे भवितव्य चांगले घडेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. असेच एक दक्ष पालक म्हणजे मुंबई येथील सौ. प्रियंका आणि श्री श्रेयस कुलकर्णी हे होत.
श्री श्रेयस कुलकर्णी हे रिझर्व बँक ऑफ इंडियात अधिकारी आहेत. तर सौ.प्रियंका या महावितरण कंपनीच्या वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्य कार्यालयात उप दक्षता अधिकारी आहेत. आपल्या अत्यंत जबाबदारीच्या नोकऱ्या संभाळून ते मुलगी श्रेयंकावर सतत उत्तम संस्कार करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या दोघांचे प्रयत्न आणि त्यांच्या प्रयत्नांना श्रेयंकाची मिळणारी योग्य साथ याचे फळ म्हणजे अवघे सव्वा चार वर्षे वय असलेल्या श्रेयंकाने इतक्या कमी वयात संस्कृत मधील ३८ श्लोकांचे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र कमीत कमी वेळेत म्हटल्यामुळे तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. या बद्दल श्रेयंका आणि तिच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या अगोदर यांच साठी तिला भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५५ व्या जयंती निमित्त मुंबईतील फिल्म सिटी मधे आयोजित झालेल्या महोत्सवात “परिवार काफ अवॉर्ड” हा पुरस्कार मिळालेला आहे.

० ते ६ या वयोगटातील बालमनावर होणारे संस्कार हे दीर्घकाल टिकणारे असतात. बुद्धीचा जवळ जवळ ९०% विकास याच कालावधीत होत असतो असं जानकर व्यक्ती म्हणतात. श्रेयंका रामरक्षा तर म्हणतेच, पण गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र अशी अनेक स्तोत्रे तिची तोंडपाठ आहेत. तिला गाणी, गोष्टी ऐकायची, सतत प्रश्न विचारून नवनवीन गोष्टी जाणून घ्यायची खूप आवड आहे. अशी ही चिमुरडी येत्या जून महिन्यात दादर येथील नामांकित बालमोहन विद्यालयात शिशुवाटिकेत प्रवेश घेत आहे.

कु. श्रेयंका आजोबा श्री. पांडुरंग कुलकर्णी हे साहित्यिक आहेत. तर आजी सौ.सविता कुलकर्णी या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्या सध्या विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शिशुवाटिका विभागाच्या सहप्रमुख आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संस्थेच्या बालमंदिर विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

श्रेयंका, तिचे आईबाबा, आजी आजोबा या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतानाच मुलांना, नातवंडांना वेळ न देणाऱ्यांनी त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक वेळ दिला पाहिजे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Shreynka हिचे खूप खूप कौतुक व पुढील वाटचालीसाठी
    शुभेच्छा.

  2. श्रेयंका आणि तिच्या संपूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं