Sunday, January 25, 2026
Homeसेवा"आनंदपीठ : यूथ कॅम्प @भालगुडी डेज"

“आनंदपीठ : यूथ कॅम्प @भालगुडी डेज”

संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी आपलीही बांधिलकी आहे, असे मानणार्‍या तरुण, तरुणींनी एकत्र येऊन “वी द चेंज फौंडेशन” ची स्थापना केली.
“समता आणि प्रेमातून उगवलेले आनंदी जग साकारण्यासाठीची पेरणी” हे या फौंडेशनचे ब्रीद वाक्य आहे.

मुलांसाठी, युवकांसाठी फौंडेशन विविध उपक्रम आयोजित करीत असते. त्यातीलच एक सुंदर उपक्रम म्हणजे “आनंदपीठ : यूथ कॅम्प @भालगुडी डेज” हा आहे. या वर्षातला पाचवा कॅम्प १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान संपन्न होत आहे.

जग सुंदर करण्यासाठी नव्या पिढीशी संवाद साधणे हा या कॅम्प चा मुख्य उद्देश आहे. हा निवासी कॅम्प अवघ्या तीन दिवसांचा असून तो पुणे जिल्ह्य़ातील मुळशी तालुक्यातल्या भालगुडी येथे होणार आहे. हा परिसर निसर्गरम्य, डोंगराळ असून आजूबाजूला तलाव, रम्य वनराई आहे. इथे येणार्‍यांना पाखरांची गाणी ऐकायला मिळतील. विविध क्षेत्रातील नामवंत मुलामुलींशी चित्रापासून विज्ञानापर्यंत आणि संगीतापासून अर्थशास्त्रापर्यंत खूप गप्पा मारतील. या कॅम्पसोबत शेजारच्या तिकोना किल्ल्यावरचा ट्रेकही करायला मिळेल.

इयत्ता अकरावी ते पी जी पर्यंत शिकणारे युवा या कॅम्प मध्ये सहभागी होऊ शकतात. कॅम्पची सुरुवात १३ फेब्रुवारीला सकाळी होईल. तर १५ फेब्रुवारीला सायंकाळी समारोप होईल.

मनापासून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रवेश शुल्क अजिबात नाही. या कॅम्पमध्ये धडपडणार्‍या मुलींचे सर्वप्रथम स्वागत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
आनंदपीठ :
+919359003707
+919881166335.

— टीम एन एस टी. ☎️91 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments