महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर आशुतोष सलील याची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे आज स्वीकारली . यापूर्वी ते मुंबई महानगर पालिकेचे अपर आयुक्त होते.
महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रोत्साहन देऊन देशातील तसेच विदेशातील पर्यटक यांना पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असल्याचे यावेळी सलील यांनी सागितले.
विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ पुढाकार घेऊन चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
अल्प परिचय – श्री आशुतोष सलील हे यापूर्वी वर्धा व चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. अमरावती येथून श्री सलील यांनी आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. यापूर्वी त्यांना अमेरिकेतील विद्यापीठाची फेलोशिप मिळाली आहे .त्यांनी नॅशनल लॉ स्कूल बंगलोर येथून प्राविण्यासह पदवी मिळवली . त्यानंतर काही वर्ष दिल्ली उच्च न्यायालयात वकिली केली. वर्धा व चंद्रपूर येथे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल शासनाने त्यांचा उत्कृष्ठ अधिकारी महणून गौरव केला आहे.
आशुतोष सलील यांनी पर्यटन विकास महामंडळाचा कार्यभार स्वीकारला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -