आम्ही काय पाप केले
आपलेच आपल्यापासून दुरावले
कोण कुठे काय चुकले
काहीच कळेनासे झाले !
काय हवे असते कुणाला
कसे कळेल प्रत्येकाला
कितीही सुखाने भरले तरी
रिकामे आहेत यांचे प्याले !
हे आहे पण ते का नाही
माझेच बरोबर तू नाही
केवळ वाद, नाही संवाद
यांना नेमके काय झाले ?
कशाला म्हणायचे सदन्यान
कुठे गेले शहाणपण
पदव्या पॅकेजचे ओझे
हे सगळे हमाल झाले !
मी, माझे लहानसे वर्तुळ
आहे कुठे आनंदाचे गोकुळ
भिंतीवरचे फोटो
डस्तबिनात गेले
छतावरचे पक्षी
घरटे सोडून उडाले
रिकाम्या भिंतीच्या आत
उरले जीव सुरकुतले !!

— रचना : विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सामाजिकदृष्ट्या संवेदनशील कविता (आनंदाचे गोकूळ).
डॉ. विजय पांढरपट्टे यांची ही कविता अतिसुंदर कविता
या सदरात मोडते !
सर्वांनी अंतर्मुख व्हावे अशी कविता आपले खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा असेच लिहित राहा
डॉ. देवेंद्र भुजबळ यांच्या न्यूज स्टोरी टुडे मुळे वाचायला मिळाली
आपले खूप खूप धन्यवाद व आभार