इवलेसे बीज मी जमिनीत गाडले
आई त्याची धरा काही नाही अडले
कळलेच नाही किती झटपट वाढले
हिरव्या गार शेल्याने छानछान मढले
मोठे झाले बाळ आला नाही काळ
झाले कौतुक आणि लाड लडिवाळ
कोणी म्हणती सुंदर कोणी अप्रतिम
पाण्याची धार आणि खतांचा सरंजाम
काही दिवस महिने असेच गेले
फांद्या डहाळ्यांनी खूप डवरले
सर्वांनी खूपच संरक्षण दिले
हळूहळू आणखीच बहरले
लागल्या कळ्या झाली त्यांची फुले
वाऱ्याच्या संगतीत किती छान डुले
बाप्पाला मिळाली फुले सर्वांना भावले
स्त्रियांच्या केसात अस्तित्व दावले
उंचच उंच आणखी उंच वाढले
आकाशाला गवसणी घालायला धावले
झेली ऊन-ताप, पावसाची सरवटे
पक्षांनी ही बांधले इवलेसे घरटे
गर्द त्याची सावली घनदाट छाया
विसावतात श्रमिक आणि आयाबाया
आठवण आईची अशीच ही माया
नका घेऊ हिरावून कोणी हा साया
— रचना : डॉ. सौ.अनुपमा नरेश पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
झाडा बद्दल सुरेख वर्णन 👌👌