नवी मुंबईतील भगिनींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रा वृषाली मगदूम यांची ओळख करून देण्याची गरज नाही, इतक्या त्या नवी मुंबईतील भगिनींच्या, विशेषतः कचरा वेचक महिला आणि त्यांच्या समस्यांशी एकरूप झालेल्या आहेत.
पण आता केवळ मुंबई, नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रांपूर्तीच कचरा वेचक महिला आणि त्यांच्या समस्या मर्यादित राहिल्या नसून वाढत्या शहरीकरणामुळे इतरही शहरांमध्ये ही समस्या वाढत चालली आहे आणि त्यामुळेच प्रा वृषाली मगदूम मॅडम यांच्या सारख्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या जागोजागी निर्माण होण्याची गरज आहे.
म्हणूनच आजच्या न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल च्या “ओळख” या दुसऱ्या भागात ओळख करून घेऊ या, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, प्रा. वृषाली मगदूम मॅडम यांची. ही मुलाखत घेतली आहे, न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी.

दोन विशेष मुलांना घडविणाऱ्या सौ अर्चना पाटील यांच्या पहिल्या मुलाखतीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. असाच प्रतिसाद या मूलाखतीला मिळेल, अशी आशा आहे. चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा. ही मुलाखत आपण पुढील 👇लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
चला, तर मग आपणही एक पाऊल टाकू या, स्वच्छ, सुंदर समाजाच्या निर्मितीसाठी.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800