मज लाभो कृष्ण माझा
तृष्णा ही एकमेव
नाही उरात काही
स्वर बासरीच ठेव
श्वासावरी तो श्याम
हृदयात कृष्ण नाम
चित्तास मोही मोहन
ते इष्ट मजला धाम
डोळ्यात रूप त्याचे
पाव्यात सूर साजे
गंधात गंध त्याचा
महिमा त्रिखंडी गाजे
सारेच रिक्त आहे
त्याच्याविना हे पाहे
तो लाभताच लाभे
पूर्णत्व सारे सारे
नयनात वाच गाथा
तूझीच रे अनंता
कणकण तुझाच आहे
राधाही भगवंता

रचना : डॉ.मंजूषा कुलकर्णी.
व्वा.. अप्रतिम