“बदामी”
बदामीला, वृध्दाश्रमात, मी आणि माझा मुलगा जायला निघालो आणि पाऊस पुन्हा पुन्हा पडू लागला.
“ईतक्या दूर, वृध्दाश्रमात कशाला ? मुंबईत बघ.” — मी.
“आई अग, दूर मजा येईल, तुला सारखे घरी यावेसे वाटणार नाही” – मुलगा.
सुन घर आवरत होती, पण मनातून खुष होती.
मी थोडी नाराज झाले होते.
“दोन महीनेच जायचेय, आई” – मुलगा
“हो, मी जाणते,
तुला माझ्यावाचून राहवणार नाही” – मी
“बदामी सुंदर आहे, तू रमशील”, मुलगा समजावत म्हणाला.
“दोन महिन्यांनंतर परिस्थिती बदलताच, तुला परत आणीन” मुलगा, हात हातात घेवून म्हणाला.
खुळा पाऊस थांबेना. गाडी बंद पडली. वृध्दाश्रमात जायचा निर्णय सोपा नव्हता. माझी एनर्जी कमी झाली होती. कश्यामुळेही कार बंद पडल्यावर पण नाराज होत होते.
रस्त्याच्या मध्यभागी उंचवटा होता तिथे, चढून थांबलो. चारी बाजूंनी पाणी वाहत होते. असं वाटत होतं एका बेटावर उभ्या आहोत. हे, बेट बुडेल की काय ? इटलीच्या ट्रिव्हिया फाउंटनची आणि ठाण्याच्या एका ट्रायजंक्शन ची आठवण येत होती. पूर्वी लाव्हा रस पसरल्याने पृथ्वीवर, पट्ट्यांमुळे वेगळे वेगळे झालेले प्लेट्स हल्ल्यामुळे पृथ्वीला खूप मोठं नुकसान होतं. कधी कधी परबत तुटून जातात, झरे तयार होतात.
लाटा येत होत्या. टाळणाऱ्या शेवटच्या लाटा जणू काही सुनामीचा्या येतात.डोंगर कापून दर्या ताब्यात घेवून, प्लॅाट पडून आपण फार्म हाऊस विकू शकू असं बाजार बसवणाऱ्यांना वाटते.
या परिसरात एकेचाळीस गुहा होत्या. या जागेचेच गुहांमध्ये अकरा म्हाताऱ्या राहात होत्या. पाण्याखालच्या जमिनीत पण रंगीबेरंगी जग होते. रात्रीत साधेपणाचं असे वाटे की जणू पाण्यावर पडलेल्या चांदण्या आपल्याला येऊन स्पर्श करतील. पण हा खुळा पाऊस कधीही यायचा. परीकथेतील राजकुमार यावा, स्वप्नांमध्ये यावा तसे तरी कधी खूप स्वप्नवत आनंदी वाटायचं पण कधी कधी अज्ञात भीती वाटायची. सुपर पॉवर हा एक युसलेस शब्द असतो. वय वाढलं की रिस्क घेण्याची हिंमत कमी होते. सगळ्यांचीच भीती वाटू लागते.
या अशा बदामीच्या सुंदर जागेत त्या अकरा म्हाताऱ्या सोबत मी बारावी म्हातारी राहू लागले.पाण्यात ऑक्टोपस होते. झाडांमध्ये निसर्ग फार वेगळा होता. थर्मामीटर बर्ड होता.मोठमोठे भारद्वाज पक्षी होते. हिरवीगार झाडी होती. हत्ती तलाव होता. तलावात मूर्ती होत्या. अनेक गाई, बकरी, बछडे फिरत होते. कोवळी पानं होती.
आनंद आणि आजाराचा संबंध असतो का ? कोणता ब्रश कुठे वापरायचा ही जशी कला असते तसाच आनंद कला आकलनाचा असतो. पण कला, कला असते. हाड जोडण्या चे किंवा मन जोडण्याचे औषध नसते. मग औषध असते तरी कशाचे ? पैशाचा उपयोग करुन खरेदी केलेली औषधे फक्त शरीरावर परिणाम करतात का? की त्या मनावर करतात ? पावसात, फुले पत्री, खाणे, आनंद कशात हवा ? सर्वत्र असते ती हवा फुग्यांमध्ये मुळात नसते. त्यामुळे फुगा फुगवायला अन्य व्यक्ती लागते. आनंदी राहायला पण अन्य व्यक्तीची गरज असते का ?
आश्रमात पावसाचे पाणी शिरले. मनावर उद्या कसे होणार ही चिंता, सर्वांना चलबिचल वाटलं. भांडणे कमी झाली. दुपारी ऊन्हे पडताच, देहाला बरे वाटले. मनी, विचारात गोंधळ निर्माण होणं थोडं कमी झालं. प्रतिकारशक्ती वाढली.
प्रत्येक व्यक्ती निराळी असते. देवळांमध्ये मंदिरांमध्ये कुंडलीनी शक्ती असते. मात्र ती शक्ती प्रमाणाबाहेर जर जास्त झाली तरी त्रास होतो.
बदामीच्या काही देवळांमधून परत आश्रमात आल्यावर आपली चिडचिड होते. मी बागेत बसू लागले. तशी मी नास्तिक होते. माझा विश्वास नाही असं म्हणणाऱ्या वर हीलिंग होत नाही. यशापयश, विश्वास, सूर्य, वारा…
अकरा म्हातार्या बरोबर मी बारावी, आश्रमात रमतगमत, एकरुप झाले. इथले लोक, स्त्री पुरुष रोमँटिक वगैरे नव्हते.” तव, मनांचे, नयनांचे, दल फुलले रे” वरील कविता मला आवडत नव्हत्या. तुझे डोळे ठीक आहेत, नजर बरी आहे. मला वृत्ती सामान्य मिळाली होती. माझ्या घरी मी कुणाचे अतिथ्य करत नसे. माझी मी आपली खाऊन पिऊन टापटिप असे. मी अन्य सदस्याकडे, दुसऱ्याच्या घरी गेल्यावर मात्र झोपुन घेई. खायचे ते चोपून खायचे. वर बांधुन आणत असे.
इथल्या राहणीमुळे जीवन क्रम बदलला. सगळ्या क्षेत्रात हात मारायला हवा का ? का ? फॅमिलीत अलिप्त राहुन काही चित्र, क्शेत्र मी दूरच ठेवली होती. व्यवहार, शेअर बाजार, पैसा यातच मी खूश होते.
खोलीत माझ्यासोबत दिलेली बाई कविताबिविता करायची. मूर्ख दुःखाचा कचरा वेचणारी बाई होती. “मी काय थोडेच दिवस ईथे ठहरणार होते. नंतर सुनेचे बाळंतपणाला माझा मुलगा मला नक्की परत बोलावेल, याची मला खात्री होती. सुनेची आई खेडवळ बारीक, उपाशी पोटी राही.
ती काय महान ? ती काय बाळंतपण, बाळाचे पण करणार काय ? “मी
“दोन महीने राहायचे. ”मॅनेजरबाई
“आता मुलगा मला नक्की घ्यायला येणार होता.” मी
“मला पण असेच सांगुन ईथे सोडले.”गंगाबाई अहो, तुम्ही दुर्मुखलेल्या,तुम्ही नकोशा झाला असाल ! ”मी.
“तुमचे वय लहन आहे, तुम्ही पटकन उठता, बसता, चाळीशीच्या वाटता”- सीताबाई. मी खूष झाले.
या कचरा वेचणाऱ्या दुःखाबद्दल सारख्या बोलणाऱ्या बाईंबद्दल मला खूप कंटाळा येई या मैत्रिणीच्या मनात भीतीचा औदुंबर कायम पाय टाकून बसलेला. दूरवर घुबड ओरडले, तरी ती निशाबाई घाबरायची. नीरव शांततेत दूरवर पक्षी गात असेल अथवा घुबड रडो, माणूस मरो,काही सुद्धा होवो, मला फरक पडत नसे. कुत्रा रडला, तरी माझा हेडफोन सुरू राही. मिळालेल्या छान, खोलीसाठी खूष असे. निशाला चित्राला काय दुखते, यामध्ये मला काय फरक पडत होता.
आश्रमातील काकुंनी, त्या सांगायच्या इथे तुम्हाला भरपूर ऑक्सिजन मिळेल. खुसपटे न काढता, योगा बरोबर स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवा, असे सांगितले.
बोलता बोलता एक महिना उलटला. निशीच्या रडगाण्याचा कंटाळा आला होता. पण ही रुम मस्त होती. जेवणात दुरुन आणलेल्या, काही स्वस्त त्याच त्या भाज्या असायच्या. गवार, कारला, सॅलड, कोबी वगैरे. रोज स्विटडीश असे. या गोड पदार्थाचा असा आनंद मी जीभेवरुन मनापासून घेत असे. उतावळेपणा न करता, मनापासून नकारात्मकता न आणता मनाने या आश्रमात रमले. एक झाले. कुठे बोलायचे, कुठे गप्प रहायचे कुठे गायब व्हायचे. नंतर हे ते, ह्यांची प्रतिक्रिया न देणे हे, आता मला कळले होते. माझी रुम मेट, निशा खूप लिहित राही. कविता, कथा, मानपाठ मोडुन लिहीत बसे. मीही रमले.
मुलगा सुनेच्या बाळंतपणाला बोलावेल, असे वाटले,पण मुलाने बोलावलेच नाही.”आई तुला झेपणार नाही, राहा मजेत तिथे” – मुलगा
मी भांडले, ”घर देणार नाही, व्हील बदलेल, दागिने देणार नाही” अशा धमक्या दिल्या, पण मुलगा बधला नाही.
“सहा महिन्यानंतर, नेईन, सासुबाई रागावु नका. मला दागिन्यांचा मोह नाही” सुन गोड बोलली.
“आई, तुम्ही दोघी, तुमचे तुमचे बघा” मुलगा म्हणाला.
मी फोन बंद केला.
परत एका महिन्याने सुन म्हणाली, ”कुत्र पाळलय, घरात आता अडचण होते.
तुम्हाला आश्रमातुन घरी नेण्याचे, नंतर बघु”
“मुले अशी, हा बायकोचा बैल झालाय” मी मॅनेजर बाईंना म्हणाले.
“राहा, तुम्ही, कशाला टेन्शन घेता ?” मॅनेजर बाई.
रात्री मी निशाच्या कविता वाचत होते. मला जाणवले, बायका, फसतात. आई नकोशीच असते. चार महिन्यांनी मुलगा, सहा
महिन्यांनी नेतो म्हणाला. परत दोन महिने, मुदत वाढवून घेतली.
हंपीच्या गणेश मंदीरात एक ज्योतिषी बसतो. त्याला मी विचारले, ”मुलगा कधी बोलावेल ? एखादे व्रत सांगा”
ज्योतिषाने सांगितलेले व्रत मी करते. चार महिन्यांनी ही मुलाने मला घरी नेले नाही. मग बदामीच्या शिव मंदिरातील पुजाऱ्याला जन्म कुंडली दाखवली.
“अनेक स्त्रिया हाच प्रश्न विचारतात. हेच व्रत करतात.” ज्योतिषी
मुलगा बोलावणार नाही का ?
माझा आश्रमातला, बदामीचा मुक्काम वाढलाय. बदामीचे दिवस आता सवयीचे झाले.
कदाचित मृत्युपर्यंत.

— लेखन : शुभांगी पासेबंद. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
