मानसा मानसा
कधी व्हशील मानूस
बहिणाबाईंनी वदून
आता झाले किती दिस
झोळी उचल आपुली,
भर सत्कर्माची फळं
दान करुणा, स्नेह,
प्रेमाचे दे भरून ओंजळ
सोड आता तुझे पाप,
हाव आणि भ्रष्टाचार
मुखी घेऊनी नाम,
सुरू कर सदाचार
वेळ लाव सत्कारणी,
नको ठेऊ दूजाभाव
दीन दुबळ्यांचा हो कैवारी,
चित्ती समाधान
अहं गोंजारू नको,
पाय असू दे भू वरी
प्रलय येणार पातकाने,
भय बाळग ऊरी
तुझ्या झोळीतील पुण्य,
दे वाटून सर्वांना
फळे गोमटीच येतील,
तुझ्या सत्कर्माना

— रचना : सौ.स्वाती वर्तक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर