जागतिक महिला दिनानिमित्त विविध ठिकाणी, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आणि येत आहेत. पण या दिनानिमित्त केवळ प्रबोधन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम न करता कल्याण (पश्चिम) येथील रोनक सीटी सेक्टर २ मध्ये चक्क योगासने करण्यात येऊन एक चांगला, आरोग्यदायी पायंडा पाडण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर योग प्रशिक्षक सौ रिंकू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रांच्या उच्चारासह कार्डिओ, सुर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, कपालभाती, ताडासन भ्रामणी, मस्तकी, अनुलोन – विलोन, ओंकार इ. योग प्रकार सादर करण्यात आले.
या योग सादरीकरणात योजना पाटील, रागिणी वाघ, सुवर्णा गाजरे,अर्चना आमोदकर, वर्षा भोईर, उज्वला फडके, ऐश्वर्या दांगडे, योगिता चौधरी, स्वाती पाटील, निताली पाटील, विजेता पाटोले, दिपाली निकम, नलिनी बुट्टे, सुतप्पा कोल्या, रूपा स्वा, रिंपा चेल, दिपाली गरुड, सारिका चव्हाण, समाप्ती विश्वास, प्रतीक्षा पडवाल, शुभांगी शिंपी, वर्षा बोडके, पूजा, इत्यादी महिलांसह 3 ते 12 वयोगटातील वेदिका आव्हाड, अद्विका आव्हाड, शरण्या बुट्टे, आराध्या चव्हाण, अद्विका चव्हाण इत्यादी मुलीही आनंदाने सहभागी झाल्या होत्या.

योग सादरीकरणानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना खावुन टाक या स्नॅक्स कॉर्नरने बनविलेला उखडलेले कडधान्य व त्यावर गाजर बीट किस पेरुन, असा पौष्टीक नाष्टा देण्यात आला.
सर्व कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. महिला दिनी केलेली योगासने सर्व महिला व बालिका दर रोजच करतील, असा विश्वास आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
