कामाख्या देवीच्या मंदिरातील सद्यस्थिती आणि आम्ही घेतलेले किंवा मिळविलेले दर्शन, या विषयी आपण कालच्या भागात वाचले असेलच. आजच्या भागात आपण जाणून घेऊया, या देवीची महती…
कामाख्या ही एक हिंदू देवी आहे. ती प्रजनन क्षमता आणि स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करते. ही देवी आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात विराजमान आहे. हे मंदिर देवी सतीचा गर्भाशय आणि प्रजनन अवयव पडल्याच्या ठिकाणी असल्यामुळे एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे.

जेव्हा भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृतदेहाचे ५१ तुकडे केले, तेव्हा तिच्या गर्भाशय आणि योनीचा भाग या ठिकाणी पडला. म्हणूनच या मंदिराला प्रजननशक्तीचे केंद्र मानले जाते. या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही, तर योनीचे प्रतीक कोरलेले आहे, ज्याची पूजा केली जाते. याला जीवन आणि निर्मितीचे प्रतीक मानले जाते.

दरवर्षी जूनमध्ये येथे होणारा “अंबुबाची मेळा” हा देवीच्या मासिक पाळीचे प्रतीक मानला जातो, ज्यामुळे मासिक पाळी ही नैसर्गिक आणि पवित्र असल्याची शिकवण दिली जाते. या काळात नदीचे पाणी लाल होते आणि मंदिर तीन दिवस बंद असते.
काही ग्रंथानुसार, कामाख्या देवी ही काली देवीचेच एक रूप मानली जाते, जी ज्ञान आणि सर्व गोष्टींची जननी आहे. विशेषता: मंदिराच्या गर्भात देवीच्या योनीचे प्रतीक आहे आणि याला एक पवित्र स्थळ मानले जाते. पुराण, योगिनीतंत्र आणि कामाख्या तंत्रात तिला काली म्हणून ओळखले आहे, ज्या प्रत्येक श्लोकात या श्लोकाचे प्रतिध्वनी आहे : “हे निश्चितच सर्वज्ञात आहे की कामाख्या ही खरोखरच दुसरी तिसरी कोणी नसून ती मातृदेवी काली आहे, जी सर्व गोष्टींमध्ये ज्ञानाचे रूप आहे.”

कामाख्या देवी कामाख्या मंदिर, प्रसाद स्वरूपात ओला कपडा प्रसाद स्वरूपात दिला जातो. हे एकमेव असे मंदिर आहे जेथे दहा महाविद्या विराजित आहेत.
कामाख्या देवीला ‘रक्तस्त्राव देवी’ किंवा ‘मासिक पाळीची देवी’ असेही म्हणतात, कारण असे मानले जाते की आषाढ महिन्यात देवी मासिक पाळीच्या चक्रातून जाते आणि त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल होते. या काळात ‘अंबुबाची मेळा’ हा एक महत्त्वाचा उत्सव साजरा केला जातो, जो तीन दिवस चालतो.
मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नसून, योनीच्या आकाराचे एक पाषाण आहे जे एका भूमिगत झऱ्याने ओले रहाते.
या देवीचे स्वरूप काळसर आणि विस्कटलेले असून तिच्या डोक्यावर मानवी डोक्यांचा हार असतो. तिच्या डाव्या हातात मानवी डोके आणि खर्ग (चाकू) आणि उजव्या हातात बर्मुद्रा (मुद्रा) असते. तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे.

कामाख्या शक्तीपीठवर लोकांची विशेष श्रद्धा आहे. ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे ५१ भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ती पुढे शक्तीस्थाने म्हणून ओळखली जाऊ लागली. देवी सतीचा योनी भाग या ठिकाणी पडला म्हणून या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात.
येथे होणारा अंबुबाची मेळा हा देशभरातील सर्वात महत्वाच्या उत्सवांपैकी आणि कामाख्या मंदिराच्या होळी उत्सवांपैकी एक आहे. अशी मान्यता आहे की मंदिराची अधिष्ठात्री देवी, कामाख्या, माता शक्ती या काळात तिच्या वार्षिक मासिक पाळीच्या चक्रात जात असते.
बहुतेक मंदिरांमध्ये असते, त्या प्रमाणे कामाख्या मंदिरात कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती नाही. त्याऐवजी, मंदिरात योनीच्या (स्त्री जननेंद्रिय) आकाराचे पाषाण आहे, जे शक्ती (माता सती) चे प्रतीक मानल्या जाते. हे सर्जनशील स्त्री शक्तीचे प्रतीक आहे.

मंदिराच्या परिसरात खूप गर्दी असली तरी परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. एक विशेष म्हणजे, मंदिराच्या परिसरात लहान मोठे बकरे फिरताना दिसून येतात. त्यातही ते सर्व काळया रंगाचे दिसतात. तसेच मंदिर परिसरात “बलिस्थान” अशी पाटी लावलेली जागा आहे. बहुतेक तिथेच बळी दिल्या जात असावेत. तसेच इथे प्रामुख्याने रेड्यांचा बळी का दिल्या जातो, ते प्रयत्न करूनही समजू शकले नाही. कुणा जाणकार व्यक्तीने यावर अधिक प्रकाश टाकल्यास बरे होईल. तसेच कालच्या भागात,गाभाऱ्यात जाण्यापूर्वी रेड्यांची, बकऱ्याची मुंडकी पडलेली दिसून आली, याचा उल्लेख केला आहेच. पण त्या प्राण्यांच्या धडाचे काय होत असेल ? हे ही कुणी सांगितले तर बरे होईल.
मां कामाख्या देवालयाची maakamakhya.org
https://www.maakamakhya.org ही अधिकृत वेबसाइट आहे. यावरून आपण अधिक माहिती घेऊ शकता.
— संदर्भ आणि छायाचित्रे : गुगल तसेच देवालयाच्या वेब साईट वरून.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800