साहित्यिका अनिसा सिकंदर शेख यांच्या ‘काव्यसप्तक’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन श्रीरामपूर येथे आयोजित चौथ्या युगस्त्री फातिमाबी शेख साहित्य संमेलनात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ८९ वे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते.

‘काव्यसप्तक’ या ग्रंथामध्ये सात वेगवेगळ्या काव्य प्रकारांचे सैद्धांतिक व तांत्रिक स्वरूपात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. काव्यलेखनाची आवड असलेल्या नवोदित कवींना व अभ्यासकांना हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल असा आहे. या ग्रंथास डॉ. श्रीपाल सबनीस यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून, गझलकार ए. के. शेख, साबिर सोलापूरे, डॉ. इ. जा. तांबोळी आदी मान्यवरांच्या प्रेरणादायी शुभेच्छा लाभल्या आहेत. हे पुस्तक शोपीझिनने प्रकाशित केले आहे.

अल्प परिचय : गेली ३६ वर्षे सातत्याने लेखन करणाऱ्या अनिसा सिकंदर शेख यांची यापूर्वी संवाद हृदयाशी (कवितासंग्रह), सांगाती (चारोळी काव्यसंग्रह), बाल तरंग (बालकविता संग्रह) आणि काव्यपथिक (हिंदी कवितासंग्रह) ही चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
काव्यपथिक हा कविता संग्रह महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीच्या वतीने प्रकाशित झाला आहे. तसेच पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या कार्यावर आधारित दोन प्रातिनिधीक काव्यसंग्र त्यांनी संपादित हाथ केले आहेत. कविता, गीत, अभंग, हायकू, पोवाडा, गझल, बालगझल, कथा, बालकथा अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी आजवर भरीव लेखन केले असून ‘काव्यसप्तक’ हा ग्रंथ त्यांच्या साहित्यिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
