Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्यकाही अलक

काही अलक

१. वंशाचा दिवा

वृध्दाश्रमात  त्या वृद्ध दाम्पत्यांनी आपली कर्म कहाणी सांगितली. “मुलाच्या हव्यासापोटी चार गर्भपात करून मुलगा नावाचं नक्षत्र जन्माला घातले आणि आज त्याच नक्षत्राने आमचे ग्रह नक्षत्रे फिरवून आम्हाला वृध्दाश्रमात टाकले.”

२. त्याग

लहान बहीणीचे एका सुसंस्कृत मुलावर प्रेम जडले. पण मोठ्या बहीणीचे लग्न होईस्तोवर आपल्या प्रेमाची वाच्यता कुणाजवळही करायची नाही असे वचन घेतले. मोठी बहीण लग्नाच्या मुहूर्तावर पळून गेली.
नवऱ्या मुलाने लहान बहीणीला मागणी घातली. आई वडीलांच्या विनवणी ला मान देऊन आणि त्यांच्या अब्रू खातर तीने न आवडणारी जन्मठेप स्विकारली‌ .

३. राजकारण

तो तरुण त्या नेत्याला आपले दैवत मानत असे. त्याच्यासाठी तो आंदोलन, जाळपोळ करून स्वतःला अटक करून घेत असे.त्यात तो आपली धन्यता मानी. नेत्याने ही  त्या तरुणाला आपल्या मुलगा मानला. पण जेव्हा आमदारकीसाठी  तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा त्या नेत्याला आपल्या रक्ताच्या मुलाची आठवण झाली. तो तरुण नुसता “सांगकाम्या नौकर” म्हणून प्रचलित झाला.

४. प्राणी प्रेमी

तो एक प्राणी प्रेमी असून सर्वांना प्राण्यावर प्रेम करायचे आवाहन करतो. त्याच्याकडे दोन कुत्रे व एक मांजर सुध्दा पाळले आहे आणि या पाळीव प्राण्यांना खायला चिकन आणि मटन आणतो. दारी आलेल्या भिकाऱ्याला मात्र हाकलून लावतो.

५. अशिक्षित आई

बालपणी वडीलांचे छत्र गमावल्या नंतर अशिक्षित आईने मोठ्या कष्टाने त्याला lAS बनविले. नंतर मात्र त्याला आईच्या अशिक्षितपणाची लाज वाटू लागली आणि तो तिच्यासाठी अनोळखी झाला.

६. भुक

मंदीरातील रोजची आरती झाल्यावर,ती  फ्रॉक मधे अक्षदा गोळा करायची. मंदीराची सफाई होते म्हणून पुजारी तिच्या वर्तनाला दुर्लक्षित करायचा. झोपडीत राहणारी तिचीआई त्या अक्षदाचा भात करून तिची आणि लहान भावाची भुक भागवायची.

७. पाणी

चार चार हांडे डोक्यावर घेऊन पाण्यासाठी ती खोल विहिरीत उतरायची. तिची ही कसरत जवळच्या वॉटर पार्क मधून रोज दिसायची.

— लेखन : सौ.शितल अहेर. खोपोली, रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४