Wednesday, July 2, 2025
Homeपर्यटनकेरळ : आदरापली धबधबा

केरळ : आदरापली धबधबा

नमस्कार, वाचक हो.
गुरुवायूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आवर्जून भेट दिलीच पाहिजे असे एक उत्तम स्थळ म्हणजे Athirappilly water Falls – आदरापली धबधबा. इथे बाहुबली सिनेमाचे शूटिंग झाले होते. इतरही अनेक सिनेमांचे इथे शूटिंग झाले आहे आणि होत असते.

त्रिशूरपासून साधारण ५५ किलोमीटर आणि गुरुवायूर पासून ८० ते ८५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण येते. गुरुवायूर पासून इथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
त्रिशूर जिल्ह्यात चालाकुडी तालुक्यात हे धबधबे येतात.

अन्नामलई डोंगरात चालाकुडी नदी उगम पावते. आदरापल्लीत तिचे रौद्र रूप आपणास पाहण्यास मिळते. धबधबे पाहताना आपणास जाणवतेही.
८० फूट उंच आणि ३३० फूट रुंदीत पडणारे शुभ्र फेसाळ पाणी जोरजोरात खडकावरती आदळत असते. त्याचा आवाजही त्याच प्रमाणात येत असतो. सार काही वर्णातीत असंच आणि म्हणून तर या धबधब्याला, दक्षिणेतील नायगारा धबधबा म्हणतात.

पावसाळ्यातला नजारा तर अवर्णनीय असतो. इथले सौंदर्य पाहाण्यासारखे असते. इथून पुढे चालाकुडी नदी शांत होत जाते. इथल्या घनदाट जंगलात इथले वैशिष्ट्यपूर्ण प्राणी, पक्षी आणि वनस्पती आहेत.

केरळचा राष्ट्रीय पक्षी धनेश (Great hornbill) इथे पाहण्यास मिळतो आणि त्याच्या दुसऱ्या जाती malabar pied hornbill, malabar grey hornbill या सुद्धा सापडतात. International Bird Association ने Important Bird Area म्हणून हे जंगल घोषित केले आहे.

केरळचा राष्ट्रीय पक्षी धनेश

सांबार, बिबट्या, जंगली बैल (bison), वांडर (lion tailed macaque), हत्ती असे विविध प्राणी जंगलात भेटतात.

धबधबा पाहण्यासाठी जाताना तिकीट काढून जावे लागते. नाष्टा, जेवण यासाठी छोटी मोठी हॉटेल्स आहेत आणि मुक्काम करायचा असेल तर ती सुद्धा सोय आपणास उपलब्ध होते.

धबधब्याच्या पाण्याशिवाय पाण्यातील खेळ खेळायचे म्हटले तर water park आहे, तिथे जाऊन मज्जा करता येते खास करून मुलांसाठी ही आवडती जागा होते.

पर्यावरण सुरक्षेसाठी इथे प्लास्टिक बंदी आहे. याची गरजही आहे. शांत, रम्य रस्त्याने जाताना प्रकृती आपणास साद देत असते, बोलवत असते. जणू सांगत असते तुम्ही काही मला देवू शकत नाही पण आहे ते तरी जपण्याचा प्रयत्न करा ! प्रदूषण करून खराब करू नका. निसर्ग नष्ट होईल असे वर्तन करू नका.

आपण स्वतःहुन काही गोष्टींची जबाबदारी घेतली, काळजी घेतली तर बंदी करण्याचीही वेळ येणार नाही एवढं मात्र नक्की. हो की नाही ?

केरळला फिरायला येऊन तुम्ही जर हा धबधबा पाहिला नाही तर काय पाहिलं ? असा प्रश्न मात्र नक्की पडू शकतो बर का..

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील