निवडणूक काळात
पडे इथे तिथे धाडी
मोठा साठा नोटांचा
तुडुंब भरलीयं गाडी
पाणी नाही प्यायला
दारुचीलावली गोडी
पोलिस झाले सतर्क
शोधून काढी खोडी
इलेक्शन आयोगाची
नजर सुतीक्ष्ण करडी
कुठे कुणाचा हवाला
बरोब्बर पकडे नरडी
समाजकंटकपाठीची
सोलून काढते धिरडी
धर्मस्थळी प्रसाद वाटे
पैशांनी भरली परडी
दंगलखोर ते जेल बंद
कुणीही पेटवेलं काडी
किती करायचे जेरबंद
किती आवळावीनाडी
आपले सुध्दा कर्तव्य
लाज बाळगावी थोडी
नागरिक हो जिम्मेदार
सुटती असंख्य कोडी
लोभलाभ हव्यासहाव
प्रलोभने सगळी सोडी
लोकशाहीचामहोत्सव
मतदानात वाढो गोडी

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
