अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकाविणाऱ्या “खिसा” या लघुपटाने ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही आपल्या नावावर केला आहे.
नॉन फिचर फिल्म कॅटेगिरी – शॉर्ट फिल्म- या कॅटेगिरीत दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांना सर्वोत्कृष्ट डेब्यूडन्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नुकतीच भारत सरकारकडून करण्यात आली.
खिसा हा लघुपट पीपी सिने प्रॉडक्शन आणि लाल टिप्पा फिल्म्स, मुंबई यांनी संयुक्तरित्या निर्माण केला असून राज मोरे व संतोष मिथानी यांनी हातभार लावला आहे. विदर्भाच्या अकोल्यात चित्रित झालेल्या या लघुपटाची या आधी इंडियन पॅनोरमासाठी निवड आणि स्क्रिनिंग झाली असतांनाच ती राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरेल अशी फिल्म समजल्या जात होती. ज्यांनी हा लघुपट विविध महोत्सवात बघितला होता ते प्रेक्षक आणि कलाकार सोशल मीडिया वर या लघुपटाचे कौतुक करीत होते.
महाराष्ट्रातील एका लहान गावात बाकी मुलांच्या शर्टाच्या खिशा पेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या एका मुलाची् खिशात न मावनारी कथा म्हणजे “खिसा”. कंचे, बिल्ले, छोटे दगड, नाणी इत्यादींनी भरलेला तो खिसा ज्यात अजूनही खूप जागा आहे पण त्या मुलाला सामाजिक राजकारण आणि तथाकथित पारंपरिक निती मूल्यांच्या खिशात राहणाऱ्या माणसांमधे वावरतांना कसा आपला मोठ्या खिश्याचा बळी द्यावा लागतो याची एक मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे . तशीच ही कथा देशाच्या सामाजिक वातावरण आणि आजही संकुचित असलेल्या खेडे गावातील दृष्टिकोनावर भाष्य करते . चित्रपटाचा स्क्रीन प्ले खूप तगडा आणि देखणा झाला आहे अर्थातच कथानक उत्तम असल्यास संवादांची संख्या दृश्यांपेक्षा कमीच आहे त्यामुळे हा लघुपट एक “व्हिजुअल ट्रीट” म्हणता येईल.
कॅमेराने कथा घडत असलेल्या गावाचा स्वभाव उत्तम टिपला केला आहे. तो कुठेही अवास्तववादी वाटत नाही. शिवाय आपल्याला आपल्या शाळेत घेऊन जातो. सर्वात जमेची बाजू म्हणजे कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधूदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि बाल कलाकार वेदांत क्षीरसागर यांनी कमालीचा अभिनय केला आहे .
राज प्रीतम मोरे हे ५४वे राष्ट्रीय ललीतकला अकॅडमी पुरस्कार प्राप्त देशातील ख्यातनाम चित्रकार आहेत. खिसा हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच लघुपट आहे.
-देवेंद्र भुजबळ.9869484800.
सर मलाओपान मेटर पाठवत चला मला पन कहरेज घेता येइल
आपला
रत्नदीप सिसोदिया
८८८८८१२०२०
९७३८९३३९३३