Saturday, December 21, 2024
Homeबातम्या"ग्रंथाली ने नवी अभिरुची निर्माण केली" - देवेंद्र भुजबळ

“ग्रंथाली ने नवी अभिरुची निर्माण केली” – देवेंद्र भुजबळ

आपण बालपणी चांदोबा मासिक वाचायचो, पुढे तारुण्यात पदार्पण केल्यावर वि स खांडेकर आणि ना सी फडके यांच्या कादंबऱ्या आणि बाबुराव अर्नाळकर च्या रहस्यकथा वाचित असू .पण ग्रंथाली ने विविध लेखकांची, विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करून माझ्यासारख्या असंख्य वाचकांमध्ये नवी अभिरुची निर्माण केली आणि ती सतत जोपासली, असे सांगून ग्रंथाली विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी श्री देवेंद्र भुजबळ यांनी दूरदर्शन चे निवृत्त संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांनी लिहिलेले आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेले “सत्तरीतील सेल्फी” हे पुस्तक ग्रंथाली चे संस्थापक सर्वश्री जेष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांना भेट दिले. हे पुस्तक पाहून दोघेही चांगलेच प्रभावित झाले. विशेष म्हणजे या पुस्तकाला श्री कुमार केतकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

श्री जयू आणि पद्मा भाटकर यांच्या वैष्णो व्हिजन या संस्थेने नुकताच ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात ग्रंथाली च्या पन्नाशी निमित्त “पन्नाशीतील ग्रंथाली” हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमा दरम्यान श्री जयू भाटकर यांनी ग्रंथाली चे सर्वश्री कुमार केतकर, दिनकर गांगल, अरुण जोशी, डॉ लतिका सुर्यवंशी, डॉ मृण्मयी भजक यांची प्रकट मुलाखत घेतली. ही मुलाखत चांगलीच रंगतदार आणि प्रबोधन करणारी झाली.

या कार्यक्रमात स्थानिक साहित्यिक आणि ग्रंथाली चे निष्ठावंत कर्मचारी यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अस्मिता पांडे यांनी सुंदर केले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सानप आणि साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. ग्रंथाली या ग्रंथांच्या वाचनाला चालना देण्यासाठी तयार झालेल्या चळवळीतून अनेक होतकरू लेखकांना आपले वैचारिक धन सादर करण्यासाठी सोय झाली. याला ५० वर्षे पूर्ण झाली यात या चळवळीचे यश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments