Monday, June 30, 2025
Homeसाहित्यचंद्रभागा

चंद्रभागा

गात्र पांगळून जाता
होई मनही पांगुळे
परी विठूच्या ओढीने
चालो लागती पाऊले

दिंडीतल्या गजराने
भानावर येता येता
दिसू लागल्या प्रकाशी
उजळल्या पायवाटा

चालो लागली इंद्रिये
पथी निस्तरीत काटे
आणि गळून पडली
अंतरीची जळमटे

राणा अलंकापुरीचा
ज्याच्या पायी होतो लीन
झालो उतावीळ मीही
त्याचे धराया चरण

राउळाच्या गाभाऱ्यात
भेटी होता जिवलगा
डोळ्यांतून वाहो लागे
पवित्रशी चंद्रभागा

— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील
अविनाश ब.हळबे. on अष्टपैलू सुचिता पाटील