विडंबन पर कविता
दिवस उगवला चहाची दगदग बाळगावी
दहा वेळा चहा उकळून कंबर मोडावी
आज काय सपट उद्या आणा लिप्टन
किती किती कंपन्यांचे होत उद्घाटन
परीक्षा आली भुक मार साक्षी
जास्त खाऊ नको झोपच डोळ्याशी
दुध नको प्यायला कोरा चहा मागायला
अंगकांती बारीक लागते शोभायला
दीन दयाळ झालो, कोरा चहा पियायला
दूध नको काळे खडोळे हवे गिळायला
तल्लब लागली शर्करा पुरवायला
हजारो रोगान माणसं लागली हरायला
दिसभर लागतो आळस वाढायला
चहा पिऊन पिऊन लागे पित्त चढायला
गोरे येथून गेले नशाच चढवायला
विषारी अमृत पिऊन लागले रडायला
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800