“कुर्ला टू वेंगुर्ला”
“कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट अमरजीत आमले आणि विजय कळमकर यांचा आगळ्यावेगळ्या चळवळीतून निर्मिती झालेला आहे. सर्वसाधारण कुटुंबातील या जोडगोळीने अनेक सामान्य कुटुंबातील त्यांनी प्रशिक्षित केलेल्या कलाकारांना देखील या चित्रपटातून संधी दिलेली आहे.
अमरजीत आमले घाटकोपर येथील सर्वोदय शाळेचा विद्यार्थी. अभिनयाची आवड असणाऱ्या या पठ्याने विजयच्या जोडीने मागील तीस वर्ष एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे.

साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वी आपली बँकेतली नोकरी सोडून, ग्रामीण भागात होतकरू कलाकारांसाठी अनेक शिबिरे घेऊन त्यांच्या कलेला पारंगत करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कथा, पटकथा लेखन, डायरेक्शन, एक्टिंग, कॅमेरा मन अशा विविध अँगलने प्रशिक्षण दिले गेले. कसलीही अपेक्षा नाही, कुठलाही मोबदला नाही, अशा अमरजीतने सिनेसृष्टीत अनेक कलाकार घडवले. त्यातील काहीजण चित्रसृष्टीत स्थिरस्थावर देखील झालेले आहेत. असे असूनही अमरजीत सर्वसाधारणच आहे. स्वतःचे घर नाही, गाडी नाही, इतकेच काय मोबाईल सुद्धा बाळगत नाही.
कोकणचे पर्यटन आणि समस्या जगासमोर आणणारा हा चित्रपट प्रामुख्याने कोकण सोडून मुंबईच्या भुलभुलय्या च्या प्रेमात पडून मुंबईत आलेल्या तरुणांचे विचार बदलायला नक्कीच भाग पाडतो.

आपले कोकण हा जगाच्या नकाशावरील एक निसर्ग सुंदर प्रदेश आहे आणि व्यवसायाच्या तसेच नोकरीच्या अनेक संधी कशा आहेत याचे सुंदर चित्रण या चित्रपटात मार्फत केलेले आहे.
“कुर्ला ते वेंगुर्ला” हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे व पहिल्या दिवशीच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.
चित्रपट सर्व अंगाने परिपूर्ण आहे स्टोरी देखील छान आहे, तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800