कोरोना पासून संरक्षण व्हावं म्हणून सर्व नागरिकांनी मुखपट्टी वापरणं अनिवार्य आहे. मुखपट्टीचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या या प्रतिमा टिपल्या आहेत, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायचे, छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी. समाज माध्यमाचा वापर करून शासनाच्या घोष वाक्याचा बोलक्या छायाचित्रातून योग्य वापर त्यांनी केला आहे.
“मी जबाबदार “
“माझा मास्क माझी जबाबदारी ”
अशा आशयाची छायाचित्रे विविध जनजागृतीच्या उद्देशाने पाठवित असताना त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे .
श्री होकर्णे सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी छायाचित्रांचा कल्पकतेने वापर करीत आहेत.
– देवेंद्र भुजबळ 9869484800
श्री विजय होकर्णे सरांचा फार स्तुत्य आणि सुंदर उपक्रम आहे. नविन एक कल्पनेद्वारे समाजबोधन होत आहे. अलंग अलग पध्दतीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे निश्चितच फरक पडेल.
श्री विजय होकर्णे यांचा श्री देवेंद्र भुजबळ सरांचा उपक्रम सादर केला असुन दोघ सरांचे खुप खुप आभार
आभारी आहे
असं म्हटलं जातं एक छायाचित्र हजार शब्दांचा बरोबरीचे काम करते. आपले छायाचित्रकार श्री. विजय होकरणे यांनी समाज माध्यमाचा वापर करून शासनाच्या घोषवाक्यांचा बोलक्या छायाचित्रातून जनजागृती करण्याचा चांगला प्रभावी उपयोग केला आहे. त्यांचा हा प्रयोग निश्चितच यशस्वी झाला आहे याबद्दल श्री. विजय होकरणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन…