लॉकडॉउनच्या काळात अनेक घटना घडल्या व घडत आहेत. प्रत्यक्ष कोरोनाचं संकट तर आहेच पण त्याबरोबर अनेक संकटं आली आहेत. आरोग्य, अर्थ, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यातही अनेकांसाठी हा कसोटीचा काळ आहे. त्याचबरोबर अनेक धडे ही या काळाने दिले.
पण बाहेर सर्व काही बंद असले तरी मनात विचार सुरू असतात, आतली कला काही फुलायची थांबत नाही. खूप काही मनात साचलेलं असतं, ते योग्य प्रकारे चांगल्या माध्यमातून व्यक्त व्हावं , म्हणून ऑगस्ट मीडिया अँड ट्रेंनिंग, या संस्थेने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही संस्था संभाषण कौशल्य, संवाद, निवेदन सूत्रसंचालन, व्यक्तिमत्त्व विकास, महिलांसाठी स्वसंरक्षण, मानसिक आरोग्य अशा विषयांवर व्याख्याने आणि कार्यशाळांचे आयोजन करत असते. एखाद्या विषयावर स्वतःचे विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडणे वक्तृत्वात आवश्यक असते.
विचार, लेखणी आणि वाणी यांचा कस इथे लागतो.सहसा शाळा, महाविद्यालय यांच्यापुरती मर्यादित असणारी ही स्पर्धा,सर्वांसाठी खुली असावी म्हणून या स्पर्धेत वयाचे बंधन नाही आणि कोणतेही शुल्क नाही, असं संस्थेच्या संचालिका डॉ मृण्मयी भजक यांनी सांगितले. डॉ मृण्मयी ह्या स्वतः अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्या आहेत. अनेक वाहिन्यांवर आणि प्रतिष्ठित कार्यक्रमांत त्या निवेदन करत असतात.
या स्पर्धेत जगभरातून नोंदणी होत असून नोंदणीची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२०आहे. इच्छुक स्पर्धकांनी पुढील एका विषयावर पाच मिनिटांपर्यंत बोलणे अपेक्षित आहे.
विषय-
1)मला कोरोनाने काय शिकवले?
2)माझा ऑगस्ट
3)माझ्या स्वप्नातली शिक्षणपद्धती.
अधिक माहितीसाठी किंवा शंका निवारणासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल
9892981544.
9930080375.
हुंडाविरोधी चळवळीतर्फे निबंध स्पर्धा : आकर्षक बक्षिस : Click the link to read this