Homeसाहित्यजीवन बगीचा

जीवन बगीचा

जीवनाचा बगीचा फुलवावा सुंदर
फुलावे प्रेम श्रद्धा भक्ती त्याग आदर !!ध्रु!!

विचारांचा प्रभाव पडे सुमनावर
मनाचा प्रभाव पडतो सर्वांगावर
समाधानी रहावे ठेवावे सुविचार !!1!!

आहारात सत्व वागण्यात तत्त्व जरूर
वाकपटूत्व असावे मधुर चतुर
प्रवास काल आज उद्या चालू राहणार !!2!!

पावसांचे थेंब लय शिकवणार
पोहावे व्हावे समुद्र लाटांवर स्वार
सूर्यास्ताकडून शिकावे शेवट सुंदर !!3!!

फुले दिसा चे जीवन आनंदे जगणार
शर्यत मी तु पण नसे पडती भूवर
सुगंध देती सुमने निर्माल्य बनणार !!4!!

साधेपणाने खुलते सहज सौंदर्य
क्षमाशिलतेने मिळे परम शक्ती वर
नम्र सुसंवादे आनंदा येई बहर !!5!!

अरुण गांगल

– रचना : अरुण गांगल. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६