भूतान देशातील थिंपू येथे संयुक्त भारत खेल फौंडेशनने १४, १५, १६ नोव्हेंबर २०२५ अशा तीन दिवस अकराव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत भूतान, भारत, थायलंड, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, सिंगापूर, कतार फिलीपाईन्स, अबूधाबी, नेपाळ, इत्यादी देशांमधील सुमारे ७५० खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत पनवेल येथील सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त श्री विनोद चव्हाण, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ विभा, नवी मुंबईतील श्री उत्तम माने आणि रसायनी येथील श्री घनश्याम माशेलकर हे खेळाडू सहभागी झाले होते.

श्री विनोद चव्हाण यांनी ६०+ वयोगटात गोळा फेक, थाळी फेक व हातोडा फेक स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली. तर सौ. विभा चव्हाण यांनी गोळा फेक व थाळी फेक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली. त्यामुळे एकाच घरामध्ये पतीपत्नी या दोघांनी मिळुन पाच सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला.

श्री उत्तम माने यांनी ७०+ गटामध्ये लांब उडी, थाळी फेक आणि हातोडा फेक अशा तिन्ही प्रकारात मिळून तीन सुवर्णपदके पटकावली.
तर श्री घनश्याम माशेलकर यांनीही ५५+ गटामध्ये १०० मी. धावणे, लांब उडी आणि ट्रिपल जंप अशा तिन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
या जेष्ठ खेळाडूंनी केलेल्या सुवर्णमय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
